भारतात चपाती, भाकरी, नान यांसारखे पदार्थ प्रत्येकाच्या ताटात असतात. चपाती बनवायचं म्हटलं की रोज पीठ मळावं लागतं. बरेच लोक फ्रिजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या चपात्या बनवतात. पण ताज्या मळलेल्या पिठाच्या चपात्या मऊ तितक्याच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (What Are The 4 Steps To Kneading Dough)
पीठ मळताना हात खराब होतात कधी कणीक कडक होते तर कधी जास्तच सैल, म्हणून अनेकांना पीठ मळण्याचा कंटाळा येतो. (How to knead dough easily) जर तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल, तर काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही सहज पीठ मळू शकता आम्ही असे काही हॅक्स सांगणार आहोत ज्यामुळे परफेक्ट पीठ मळण्यास फायदा होऊ शकतो. (Cooking Hacks and Tricks)
१) कोमट पाण्याचा वापर
तुम्ही मळलेलं पीठ नेहमी कडक होत असेल तर कोमट पाणी वापरून पाहा. कोमट पाणी वापरल्यानं पीठ खूप मऊ होईल आणि तयार होणारी चपाती देखील मऊ होईल. थोडं कोमट पाणी पिठात टाकावं आणि हलक्या हातांनी मळून घ्यावं. हे पीठ बऱ्यापैकी मऊ होईल आणि जर तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी रोटी बनवायची असेल तर रोट्या बराच वेळ मऊ राहतील.
२) दूधाचा वापर
थोडे कोमट दूध आणि पाणी मिसळून पीठ मळून घ्या. दूध फक्त 1-2 टीस्पून घाला आणि बाकी तुम्हाला पाणी घालावे लागेल. फक्त चपातीच नाही तर पुरी किंवा पराठा बनवायलाही हा पर्याय उत्तम आहे.
आलं, बटाटा किंवा चिझ किसताना १ टिप वापरा; किसणी खराब न होता काम होईल सोपं
३) पीठ मळताना तेल मिसळा
पीठ जास्त सैल झालं असेल तर ते व्यवस्थित करण्यासाठी पीठात तेल मिसळा आणि ५ मिनिट हवेत राहू द्या. त्यानंतर कणीक पुन्हा मळा. तेलामुळे पीठ जास्त सैल किंवा कडकही होणार नाही. कणीक सैल होऊ नये यासाठी पीठात पाणी घालताना हळूहळू पाणी घाला. त्यामुळे तुमचं काम वाढणार नाही आणि पीठ चांगलं मळून होईल. ....म्हणून बर्गरपेक्षा समोसा खाणं केव्हाही तब्येतीसाठी चांगलं; हे आहेत समोसा खाण्याचे फायदे