Join us

हात न लावता पीठ मळता येते? एक ट्रिक-२ मिनिटात पीठ मळण्याची सुपरफास्ट पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 11:58 IST

How to Knead Dough, without using both hands : हात न लावता पीठ मळण्याची हटके पद्धत, चपात्या होतील मऊ-फुगतील मस्त

ठळक मुद्देपीठ मळताना हाताला व बोटांना चिकटते. जर आपल्याला हात न लावता पीठ मळायचं असेल तर, ही ट्रिक नक्की फॉलो करून पाहा.

भारतीय थाळीमध्ये चपातीला (Chapati) फार महत्त्व आहे. मात्र, चपातीचं पीठ मळणं अनेकींना कठीण वाटतं. पीठ मळणं खरंतर कौशल्याचं काम आहे. पीठ व्यवस्थित मळले गेले तर, चपात्या मऊ, टम्म फुगलेले तयार होतात. मात्र, पीठ नीट मळले गेले नाही तर, चपात्या वातड किंवा कडक होतात. कधी कधी पीठ जास्त घट्ट किंवा पातळ मळले जाते. ज्यामुळे चपात्या व्यवस्थित लाटता येत नाही.

पीठ मळताना अनेकांची चिडचिड होते. कारण पीठ मळताना हाताला व बोटांना चिकटते. जर आपल्याला हात न लावता पीठ मळायचं असेल तर, ही ट्रिक नक्की फॉलो करून पाहा. आता तुम्ही म्हणाल हात न लावता पीठ कसे मळायचे? तर, आपण या ट्रिकच्या मदतीने हात न लावता पीठ मळू शकता(How to Knead Dough, without using both hands).

हात न लावता पीठ मळण्यासाठी लागणारं साहित्य

२ कप गव्हाचं पीठ

एक कप पाणी

कमी तेल पिणारे हिरव्या मुगडाळीचे मेदूवडे करण्याची सोपी रेसिपी, उडीद डाळीपेक्षा पचायलाही हलके आणि पौष्टिक

एक चमचा मीठ

२ - ३ चमचे तेल

हात न लावता पीठ मळण्याची सोपी पद्धत

हात न लावता पीठ मळायचे असेल तर, आपल्याला मिक्सरची मदत घ्यावी लागेल. मिक्सरचं मोठं भांडं घ्या. त्यात २ कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, २ चमचे तेल व गरजेनुसार पाणी घाला. नंतर चमच्याने सर्व साहित्य मिक्स करा. यानंतर मिक्सरचं झाकण व्यवस्थित लावून बंद करा. त्यानंतर ५ - ५ सेकंदावर मिक्सर चालू - बंद करा. आपल्याला ही प्रोसेस ४ ते ५ वेळा करायची आहे. यामुळे पीठ नीट मळले जाईल.

डोसा तव्याला चिकटल्यावर तुटतो? उलथताना लक्षात ठेवा एक सोपी ट्रिक; न तुटता डोसा तव्यावरून सहज निघेल

त्यानंतर मिक्सरचं झाकण उघडा, व पीठ नीट मळले गेले आहे की नाही हे चेक करा. पीठ तयार झाल्यानंतर एका परातीत पीठ काढून घ्या. व हाताला थोडे तेल लावून पीठ हलक्या हाताने मळून घ्या. अशा पद्धतीने मेहनत न घेता पीठ झटपट मळून तयार होईल. या मळलेल्या पीठाचे चपात्या मऊ, टम्म फुगलेल्या तयार होतात. जर आपली सकाळीची टिफिन करण्याची घाई असेल तर, आपण या ट्रिकचा नक्कीच वापर करू शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स