Join us  

विकत घेतानाच कसं ओळखायचं की काकडी कडू आहे की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 10:10 AM

How to know when buying cucumber is bitter or not? कडू काकडी खाणं तब्येतीला बरं नाही, त्यामुळे कडवट काकडी खाऊ नये.

उन्हाळा सुरु झाल्यानंतर मार्केटमध्ये काकडीची मागणी वाढते. आणि काकडी महागही होते. पण काकडी आणली आणि चिरायला घेतली की कळतं की कडू आहे. कडवट काकडी खाणं तब्येतीला बरं नसतं. त्यामुळे पोट आणि पचन बिघडू शकतं. त्यामुळे कडवट कमी करण्याच्या ऑनलाइन टिप्स मिळतात त्याला भुलू नका. कडू काकडी न खाणंच योग्य. भलते प्रयोग अंगाशी येऊ शकतात. पण मग काकडी खरेदी करतानाच कसं ओळखायचं की काकडी कडू असेल की चांगली?(How to know when buying cucumber is bitter or not?).

त्यासाठी या काही टिप्स

१. शक्यतो बारीक. गावठी काकडी खरेदी करा. ज्या काकड्या रंगाने अधिक गडद आणि हिरव्या असतात त्या घेणं उत्तम.

२. जाड्या, जाड्या खूप मोठ्या काकड्या घेऊ नका. त्या जास्त पिकल्याने बिया फार असतात. अशी काकडी कडवट लागू शकते.

करा काकडीचे गरमागरम पौष्टिक थालीपीठ, करायला सोपे आणि चवीला मस्त खमंग

३. शक्यतो बारीक, कोवळ्या, लहान लहान काकड्या घ्या, त्या कडवट नसतात.

महत्त्वाचे...

मोजून १० मिनिटांत करा कोकण स्टाइल खोबरं-लसणाची चटणी, पारंपरिक लसणीचं तिखट करऱ्याची रेसिपी

काकडी चिरताना, किसताना, स्मूदी करताना आधी लहानसा तुकडा कापून चाखून पाहा. कडवट लागला तर ती काकडी टाकून द्या. कडू काकडी खाणं किंवा बिया काढून खाणंही तब्येतीला बरं नाही. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स