आपल्या रोजच्या स्वयंपाकात थोडा का असेना पण लसूण लागतोच. कधी तो वेगवेगळ्या चटण्यांमध्ये लागतो, तर कधी तो ठेच्यामध्ये लागतो. वरण, भाजी यांच्यामध्येही अनेकदा लसूण असताेच. कोणत्याही पदार्थाला जेव्हा लसूणाचा छान झणझणीत तडका लागतो, तेव्हा त्या पदार्थाची चव आणि स्वाद दोन्हीही छान खुलतो. पण कधी कधी असं होतं की ज्या पदार्थाला लसूणाचा स्ट्राँग फ्लेवर पाहिजे असतो, त्यावेळी नेमकं लसूणाचा सुवास येतच नाही (How to chopped garlic according to food). आणि जेव्हा लसूणचा मंद सुगंध अपेक्षित असतो, तेव्हा नेमकं तो पदार्थ लसूणामुळे खूपच उग्र लागतो (How to maintain garlic taste in any food). असं सगळं टाळायचं असेल आणि पदार्थांना लसूणचा परफेक्ट स्वाद आणायचा असेल, तर त्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेल्या या काही गोष्टी लक्षात ठेवा... (5 tips for adding garlic in food by celebrity chef Kunal Kapoor)
पदार्थांना लसूणाचा योग्य सुगंध येण्यासाठी....
पदार्थांना लसूणाचा योग्य सुगंध येण्यासाठी लसूण कशा पद्धतीने चिरावा किंवा कापावा, याविषयीची माहिती कुणाल कपूर यांनी नुकतीच त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते म्हणतात की तुम्ही कशा पद्धतीने लसूण चिरला आहे, यावर पदार्थाला येणारा लसूणाचा सुगंध खूप जास्त अवलंबून असतो. यासाठी त्यांनी ५ गोष्टी सांगितल्या आहेत.
स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरून घरीच करा ब्लीच, त्वचाही चमकेल- पैसेही वाचतील
१. जर एखाद्या पदार्थामध्ये फोडणीत तुम्ही लसूणाच्या अख्ख्या पाकळ्या घातल्या, तर त्या पदार्थाला लसूणाचा खूपच कमी सुवास लागेल.
२. जर लसूणाच्या पाकळ्या थोड्याशा क्रश करून फोडणीत घातल्या तर त्या पदार्थाला लसूणाचा मंद सुगंध लागतो. सूपसारखे पदार्थ करताना तुम्ही या पद्धतीने लसूण घालू शकता.
३. जर लसूणाचे लांब लांब काप केले तर पदार्थाला लसूणाचा थोडा जास्त सुगंध येतो. वरणामध्ये लसूणाचा हलका सुगंध पाहिजे असेल तर अशा पद्धतीने लसूण घाला.
नितीन गडकरींनी सांगितली ठेच्याची रेसिपी, चक्क 'हा' पदार्थ घालून त्यांच्या घरी करतात ठेचा
४. लसूण जर अगदी बारीक चिरला, तर त्याचा छान सुगंध येतो. एखाद्या पदार्थाला वरतून फोडणी घालणार असाल तर किंवा भाजीमध्ये घालणार असाल तर अशा पद्धतीने लसूण चिरा.
५. जर मसालेदार भाज्या करायच्या असतील तर लसूणाच्या फोडी करण्यापेक्षा त्याची मिक्सरमधून वाटून पेस्ट करा. यामुळे पदार्थाला लसूणाचा छान स्ट्राँग फ्लेवर येईल.