एरवी वर्षभर चिवडा, पापड सांभाळणे हे फारसे कठीण जात नाही. पण पावसाळी हवेमुळे मात्र या पदार्थांवर लगेच परिणाम होतो आणि त्यांचा कुरकुरीतपणा नाहीसा होतो (How to store chivda in monsoon?). दमट वातावरणामुळे हे पदार्थ सादळून जातात. चिवट- वातड होतात. आणि मग हे मऊ पडलेले पदार्थ अजिबातच खाल्ले जात नाहीत. म्हणूनच हे पदार्थ वाया जाऊ नयेत, त्यांचा कुरकुरीतपणा पावसाळ्यातही तसाच रहावा (How to maintain the crispness of chivda, papad in rainy season?), यासाठी खाली दिलेले काही सोपे उपाय तुम्ही करून पाहू शकता.
पापडांचा- चिवड्याचा कुरकुरीतपणा टिकवून ठेवण्यासाठी..
१. पापडांचा कुरकुरीतपणा टिकवून ठेवायचा असेल तर पापड एअर टाईट डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात ठेवा. पण ते एका खास पद्धतीने. यासाठी सगळ्यात आधी पापड एका लॉकच्या प्लास्टिकच्या पिशवीत घाला.
शिल्पा शेट्टीची रेसिपी 'ABS OF STEEL'; म्हणजे नेमकं काय? फिटनेससाठी आता हे काय भलतेच..
त्या पिशवीमध्येच पापडांच्यावर तांदूळ पसरवून ठेवा आणि मग ही पिशवी डब्यात ठेवून द्या. तांदुळामुळे पापडापर्यंत दमटपणा येणार नाही आणि पापडांचा कुरकुरीतपणा कायम राहील.
२. पोह्याचा किंवा मुरमुऱ्याचा चिवडा पावसाळी हवेतही छान कुरकुरीत ठेवता येतो.
आपला बॉडीशेप नेमका कोणता, त्याप्रमाणे कोणते आणि कसे कपडे निवडायचे? ५ टिप्स, दिसा स्मार्ट आणि सुंदर
त्यासाठी चिवडा अगोदर एका प्लास्टिकच्या पिशवीत भरा आणि नंतर ही पिशवी स्टीलच्या डब्यात किंवा घट्ट झाकण असणाऱ्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. डब्यामध्ये चिवडा ठेवण्यापुर्वी डब्यात त्या पिशवीच्या आजूबाजूला थोडेसे तांदूळ टाकून ठेवा.
३. बऱ्याचदा आपण चिवडा घेताना दरवेळी वेगळा चमचा घेतो. अनेकदा चमचा ओलसर असतो. त्याचा ओलसरपणा चिवड्याला लागतो आणि चिवडा सादळून जातो. त्यामुळे पावसाळ्यात चिवड्याच्या डब्यातच एक चमचा ठेवून द्या. पण चिवडा घेताना तुमचे हात ओलसर नसतील याची मात्र काळजी घ्या.