Join us  

१५ मिनिटांत करा चवदार मखाना खीर, हरितालिकेच्या उपवासाचा थकवा येणार नाही- घ्या सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2024 11:49 AM

Makhana Kheer For Haritalika Fast: हरितालिकेचा उपवास करून गळून जात असाल, थकवा येत असेल तर संध्याकाळच्या वेळी मखाना खीर खा. यामुळे चांगली एनर्जी मिळते. दुसऱ्यादिवशी उपवासाचा त्रास होत नाही. (how to makae makhana kheer?)  

ठळक मुद्देयामुळे अंगात एनर्जी टिकून राहण्यास मदत होईल. ॲसिडीटीही होणार नाही. दुसऱ्या दिवशी गणपतीच्या आगमनासाठी अगदी फ्रेश राहाल.

हरितालिकेच्या दिवशी बहुतांश महिला, तरुणी हौशीने उपवास करतात (makhana kheer for haritalika fast). पण बऱ्याच जणींना संध्याकाळच्या वेळेस किंवा दुसऱ्या दिवशी उपवासाचा खूप त्रास होतो. दिवसभर आपण उत्साही असतो. पण संध्याकाळी मात्र खूप गळून गेल्यासारखं होतं. थकवा येतो. बऱ्याच जणींना तर उपवासाच्या दुसऱ्या दिवशी ऍसिडिटीचा त्रास होतो. तुम्हालाही असंच होत असेल तर हा त्रास टाळण्यासाठी हरितालिकेच्या उपवासाला मखाना खीर करून खा (instant recipe of making makhana kheer). यामुळे अंगात एनर्जी टिकून राहण्यास मदत होईल. ॲसिडीटीही होणार नाही. दुसऱ्या दिवशी गणपतीच्या आगमनासाठी अगदी फ्रेश राहाल. (how to makae makhana kheer?)

मखाना खीर करण्याची रेसिपी 

 

साहित्य 

१ वाटी मखाना 

३ वाट्या दूध 

३ टेबलस्पून काजू 

लेकीला वळण लागण्यासाठी अनुष्का शर्मा करते 'या' गोष्टी, म्हणाली आम्ही परिपूर्ण पालक नाही, पण....

१ टेबलस्पून बदाम 

१ वाटी साखर 

चिमूटभर वेलची पावडर 

२ टेबलस्पून तूप

७ ते ८ केशराच्या काड्या

 

कृती 

सगळ्यात आधी तर गॅसवर एका बाजूला दूध उकळायला ठेवून द्या. त्यानंतर एका कढईमध्ये तूप टाका आणि मखाना त्या तुपामध्ये छान परतून घ्या. 

 

 

जुलाब होत आहेत, पोट बिघडलं? 'हा' पदार्थ चिमूटभर खाऊन पाणी प्या- चटकन मिळेल आराम

काजू आणि बदाम कढईमध्ये थोडे भाजून घ्या आणि त्यानंतर थंड झाले की त्यांची पावडर करा.

आता दूध जेव्हा १० ते १२ मिनिटे चांगलं खळखळून उकळेल तेव्हा एका वाटीत त्यातलं थोडंसं दूध काढा. त्यामध्ये काजू- बदामाची पावडर मिक्स करा आणि ते मिश्रण उकळत्या दुधासाेबत मिक्स करा. यामुळे दूध अगदी छान आळून आल्यासारखं घट्ट होईल. 

 

आता त्या दुधामध्ये चिमूटभर वेलची पूड, दुधात भिजत ठेवलेलं केशर आणि साखर घाला 

बेसन कच्चं राहून लाडू टाळूला चिकटतो? घरीच करा बेसन- घ्या खमंग लाडूंची सोपी रेसिपी

दुधातली साखर पूर्णपणे विरघळली की त्यामध्ये मग तुपात परतून घेतलेले मखाना टाका. एखादा मिनिट दूध उकळू द्या आणि मग गॅस बंद करा. ही झाली तुमची मखाना खीर तयार. ही खीर तुम्ही गरमही पिऊ शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करूनही खाऊ शकता.                                                                                                                                                                                                                                                    

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३