Lokmat Sakhi >Food > पराठा एक चवी अनेक ! 'फोर इन वन' पराठ्याची व्हायरल रेसिपी, करायला सोपा चवीला टेस्टी...

पराठा एक चवी अनेक ! 'फोर इन वन' पराठ्याची व्हायरल रेसिपी, करायला सोपा चवीला टेस्टी...

how to make 4 in one pratha recipe : एकाच पराठ्यामध्ये चार वेगवेगळे स्टफिंग भरुन घरच्या घरी करा हा ट्रेंडिग व्हायरल पराठा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 07:46 PM2024-07-31T19:46:27+5:302024-07-31T20:00:01+5:30

how to make 4 in one pratha recipe : एकाच पराठ्यामध्ये चार वेगवेगळे स्टफिंग भरुन घरच्या घरी करा हा ट्रेंडिग व्हायरल पराठा...

how to make 4 in one pratha recipe 4 in one pratha | पराठा एक चवी अनेक ! 'फोर इन वन' पराठ्याची व्हायरल रेसिपी, करायला सोपा चवीला टेस्टी...

पराठा एक चवी अनेक ! 'फोर इन वन' पराठ्याची व्हायरल रेसिपी, करायला सोपा चवीला टेस्टी...

'पराठा' हा असा पदार्थ आहे जो आपण कधीही खाऊ शकतो. बऱ्याचजणांना नाश्त्याला किंवा जेवणात पराठे खायला खूप आवडतात. पराठा हा असा पदार्थ आहे जो आपल्यात सगळं काही सामावून घेतो. काहीवेळा आपण कणीक मळून त्यात वेगवेगळ्या भाज्या घालून पराठा करतो, तर कधी कणकेत स्टफिंग भरून पराठा तयार केला जातो. आपण पराठ्यांचे अनेक प्रकार तयार करु शकतो. पराठे बनवण्याची प्रत्येकाची पद्धत देखील वेगळी असते. हे गरमागरम पराठे आपण खोबऱ्याची चटणी, दही, सॉस किंवा लोणच्यासोबत अत्यंत आवडीने खाऊ शकतो. काहीवेळा घरात कोणती भाजी नसली किंवा काही वेगळं खावंसं वाटलं तर आपण झटपट बनून तयार होणारा पराठा बनवतो(how to make 4 in one pratha recipe). 

सध्या इंटरनेटवर पराठ्याचा असाच एक हटके प्रकार व्हायरल होताना दिसत आहे. या पराठ्याचा व्हायरल झालेला प्रकार म्हणजे 'फोर इन वन पराठा'. पराठ्यात आपण असे सुद्धा कोणत्याही भाज्यांचे स्टफिंग भरुन तो स्वादिष्ट करू शकतो. परंतु या व्हायरल फोर इन वन पराठ्यात आपण एकाच वेळी चार वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग भरुन हा पराठा करु शकतो. एकाचवेळी चार वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खाण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. हा पराठा बनवायला अगदी सोपा आहे. नेहमी जसा आपण पराठा बनवतो तसाच पराठा बनवायचा आणि त्यात आपल्या आवडते चार प्रकारचे स्टफिंग भरू शकतो. हा व्हायरल फोर इन वन पराठा नेमका कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात(Easy & unique Paratha Recipe, 4 flavors in 1 Paratha).

फोर इन वन पराठा नेमका कसा तयार करायचा ? 

१. फोर इन वन पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी पराठे बनवण्यासाठीची कणीक व्यवस्थित मळून घ्यावी. ही कणीक मळून झाल्यानंतर १० मिनिटे कणीक झाकून ठेवावी. १० मिनिटानंतर या कणकेचे थोडे मोठे गोळे करुन घ्यावेत. आता यातील एक कणकेचा गोळा घेऊन त्याचा गोलाकार पराठा लाटून घ्यावा. 

२. हा गोलाकार पराठा लाटून घेतल्यानंतर, बरोबर मध्यापासून खाली सुरीने एक उभा कट द्यावा. आता पराठ्यांचे चार भाग होतील अशा प्रकारे पराठ्यात चार प्रकारचे स्टफिंग भरुन घ्यावे. स्टफिंग भरुन झाल्यानंतर जिथे आपण कट दिला आहे. तो भाग उचलून एकावर एक अशा पद्धतीने ठेवत पराठा गुंडाळून घ्यावा. 

इडली स्टँड वापरून १० मिनिटांत ढोकळा करण्याची पाहा ट्रिक, विकतचा ढोकळा कायमचा विसराल इतका छान...


पराठा चमचमीत करण्यासाठी ही घ्या ‘पराठा मसाला मिक्स’ची खास रेसिपी, ‘असा’ पराठा तुम्ही खाल्लाच नसेल..

३. तव्यावर थोडेसे तेल किंवा बटर लावून हा 'फोर इन वन पराठा' दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा. पराठ्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तो खरपूस भाजून घ्यावा. आता हा फोर इन वन पराठा खाण्यासाठी तयार आहे. हा गरमागरम पराठा आपण दही, सॉस, चटणी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा. 

४. पराठ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग भरु शकता. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो किंवा आपल्या आवडत्या भाज्या बारीक चिरुन घालू शकता. त्याचबरोबर आपण या चार भागांपैकी एका भागाला मेयॉनीज, शेजवान सॉस किंवा वेगवेगळ्या चटण्या देखील लावू शकता. यात आपण पनीर कुस्करुन घालू शकता. त्याचबरोबर बटाट्याचे, पनीरचे किंवा कुठली भाजी उरली असेल तर ती देखील स्टफिंग म्हणून घालू शकता. अशाप्रकारे आपण आपल्या आवडीनुसार स्टफिंग भरुन हा 'फोर इन वन पराठा' तयार करु शकतो.

फोडणी देताना तेल अंगावर उडू नये म्हणून फोडणीत सर्वात आधी घाला हे २ पदार्थ, हातांवर तेल उडण्याची भीतीच नाही...


Web Title: how to make 4 in one pratha recipe 4 in one pratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.