हिवाळ्यात आल्याचा चहा (Ginger Tea) पिण्याचा आनंद काही औरच असतो. प्रत्येकाला एक कप आल्याचा चहा आवडतो. हा चहा सर्दी तर दूर करतोच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे (Healthy Tea). त्याची चवही अप्रतिम आणि फक्कड असते. पण चहा बनवण्याची योग्य पद्धत अनेकांना ठाऊक नाही (Tea Making). कधी चहा बेचव होतो, तरी त्यात साखर आणि मसाल्याचे प्रमाण कमी पडते. फक्कड चहा बनवण्याची पण एक पद्धत आहे.
जर आपल्याला ठेल्यावर मिळतो तसा फक्कड चहा बनवायचा असेल तर, चहामध्ये आलं कधी घालावं हे जाणून घ्या. आलं घातल्याने चहा कडक आणि फक्कड होतो. आल्याचा कडक चहा नक्की कसा तयार करायचा? पाहा(How to Make a Good Cup of Ginger Tea).
आल्याचा चहा करताना कुठे चुकता?
- आल्याचा चहा करणं सोपं नाही. पण अवघडही नाही. फक्त प्रमाण आणि चहा बनवण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी.
- आल्याचा चहा तयार करताना चहापत्तीसोबत आलं घालू नये. यामुळे चहाची चव बिघडू शकते.
- चहा करताना आधी पाणी उकळवत ठेवा. नंतर त्यात चहापत्ती, साखर आणि दूध घाला. नंतर त्यात आलं घाला. चहा काही वेळ उकळवण्यासाठी ठेवा.
फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल
- चहाला उकळी फुटल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर गॅस बंद करून चहा गाळून घ्या, आणि चहाचा आस्वाद घ्या.
- आल्याचा चहा जर आपण करत असाल तर, त्यात ठेचलेलं आलं घालू नका.
- चहामध्ये आलं घालताना किसून घाला. किंवा चिरून घाला. यामुळे आल्याचा रस चहामध्ये योग्य पद्धतीने मिसळेल.
आलं खाण्याचे फायदे
- आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. आल्याचा वापर तुम्ही कशातही करू शकता.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
- आल्याने सर्दी - खोकल्याचा त्रास कमी होतो. यासह साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
- आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो. जर आपल्या स्ट्रेस जाणवत असेल तर, आपण आल्याचा चहा पिऊ शकता.