साधारणपणे जुलै - ऑगस्ट महिना येतो तोच मुळात पाऊस घेऊन. कधी रिमझिम तरी कधी धो - धो बरसणाऱ्या पावसात आपल्याला काहीतरी गोड आणि गरमागरम खुसखुशीत खायची इच्छा होतेच. अशातच अनेक सणवार देखील येतात, या सणवारातच परंपरेने जोडलेले खाद्यपदार्थही त्यामागोमाग येतात. या काळात पावसासोबतच गरमागरम खाण्याची इच्छा होते. गुळाच्या दशम्या हा असा प्रकार आहे की, तो बनवल्यावर किमान ५ ते ६ दिवस व्यवस्थित टिकून राहतो. पूर्वी प्रवासाला जाताना हमखास गुळाच्या दशम्या बनवून नेल्या जात असे. हा पदार्थ गरमागरम असताना दुधासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतो.
बाहेर धो - धो कोसळणारा पाऊस आणि त्यासोबत गुळाच्या हेल्दी दशम्या याहून मोठे सुख: नाही. गुळाच्या दशम्या हा एक मराठी पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ अतिशय कमी साहित्यात झटपट होणारा असा पदार्थ आहे. या पदार्थात गुळाची पौष्टिकता व तिळाची भरपूर पोषणमूल्य आढळून येतात. त्यामुळे पावसाळयात आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तीळ व गुळाची पौष्टिक दशमी बनवायला व त्याचा आस्वाद घ्यायला विसरु नका. गुळाच्या दशम्या बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make a Gulachya Dashmya At Home).
साहित्य :-
१. गूळ - १ कप (किसलेला गूळ)२. पाणी - १ कप ३. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ४. वेलची पूड - १ टेबलस्पून ५. जायफळ पूड - १/४ टेबलस्पून ६. गव्हाचे पीठ - १ कप ७. तूप - २ ते ३ टेबलस्पून
कोथिंबीर-पुदिन्याची जुडी निवडली पण दोन दिवसात सडली तर ? ३ उपाय, पुदिना - कोथिंबीर राहील हिरवीगार...
कृती :-
१. सर्वप्रथम एक मोठा बाऊल घेऊन त्यात किसलेला गूळ घ्यावा, आता यात गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. २. पाणी घातल्यानंतर गूळ चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावा. जोपर्यंत गूळ संपूर्णपणे पाण्यांत विरघळून एकजीव होत नाही तोपर्यंत चमच्याने ढवळत राहावे. ३. आता एक मोठं भांड घेऊन ते गॅसच्या मध्यम आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावे. ४. त्यानंतर एक मोठी गाळण घेऊन ती त्या भांड्यावर धरून त्यात तयार केलेले गुळाचे पाणी ओतून ते गाळून घ्यावे. ५. हे मिश्रण किंचित गरम होऊ द्यावे. त्यानंतर त्यात पांढरे तीळ, वेलची पूड, जायफळ पूड घालून घ्यावी. हे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावे.
फक्त १० मिनिटांत घरीच करा हलका-जाळीदार ढोकळा, मिश्रण न फेटता, न आंबवता करा ढोकळा...
साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...
६. आता या मिश्रणात गव्हाचे पीठ घालून हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. त्यानंतर हे पीठ ५ मिनिटे तसेच झाकून ठेवावे.७. हे पीठ किंचित गरम असताना एका डिशमध्ये काढून व्यवस्थित मळून घ्यावे. ८. मग या पिठाचे लहान लहान गोळे करून त्याच्या छोट्या छोट्या दशम्या लाटून घ्याव्यात. ९. गरम तव्यावर या दशम्या तूप घालून दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्याव्यात.
गरमागरम गुळाच्या दशम्या खाण्यासाठी तयार आहेत. या दशम्या शेंगदाण्याची सुकी चटणी किंवा दुधासोबत खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.