Join us  

करंजीचं सारण सैल किंवा कोरडं होतं ? घ्या सोपी रेसिपी, महिनाभर टिकतील करंज्या, सारणही होणार नाही खवट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 2:21 PM

Diwali Special : How To Make a Karanji Saran At Home : करंजी तेव्हाच चांगली लागते जेव्हा सारण परफेक्ट जमतं, त्यासाठी ही घ्या खास कृती...

दिवाळीच्या (Diwali 2023) फराळातील करंजी (Karanji saran) हा तसा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. फराळाच्या ताटातील करंजी खाण्याचा मोह कुणीही आवरु शकत नाही. छान कुरकुरीत, खरपूस तळून घेतलेल्या पारीमध्ये सुकं खोबर व रव्याच सारण भरलेली करंजी खाणे म्हणजे सुखं. ही अशी टम्म फुगलेली करंजी खाण म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच असते. असे असले तरीही करंजी बनवणं मात्र काही सोपं काम नाही. करंजीची पारी व करंजीचे सारण बनवा असे अनेक उद्योग करावे लागतात. यासोबतच एवढे करूनही काहीवेळा करंजीचा आपला बेत फसतो. या करंज्या कधी फुटतात, सारण कडक होत, सारण कधी खवट होत अशा अनेक प्रकारे करंजी बिघडू शकते(Different Types Of Karanji Saran).

करंजी खाताना त्याची अस्सल चव लागते ती त्यातील गोड सारणामुळेच. करंजीच्या आतील सारण योग्य पद्धतीने बनवले तरच या करंज्या चवीला उत्तम होतात. करंज्या बनवायला खूप वेळ लागतो तर कधी पुरेपूर वेळ देऊन मुबलक साहित्य वापरूनही करंज्या हव्या तश्या बनत नाहीत. म्हणून अनेक बायका घरी करंज्या बनवणं टाळतात. करंजी तयार करताना काही टिप्स लक्षात ठेवल्या तर आपलं काम आणखी सोपं होऊ शकतं याशिवाय पदार्थ बिघडण्याची शक्यताही कमी असते. यासाठीच परफेक्ट करंजीच सारण (Perfect Karanji Saran Recipe) नेमकं कसं बनवावं ? त्याच प्रमाण नेमकं किती असावं ? या सगळ्याच योग्य गणित जमलं तर करंज्या परफेक्ट झाल्याचं म्हणून समजा(How To Make a Karanji Saran At Home). 

साहित्य :- 

१. साजूक तूप - ३ टेबलस्पून २. ड्रायफ्रुट्सचे काप - १/४ कप ३. चारोळी - १/४ कप ४. बारीक रवा - १/२ कप ५. सुकं खोबर - १ कप (किसून घेतलेलं)६. पिठी साखर - ३/४ कप ७. वेलची पूड - १ टेबलस्पून ८. खसखस - १ टेबलस्पून 

फराळाची राणी नाजूक चंपाकळी ! पारंपरिक सुंदर गोड पदार्थ दिवाळीत करा नक्की, पाहा रेसिपी...

आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या कढईत साजूक तूप घेऊन त्यात ड्रायफ्रुट्सचे काप, चारोळी, खसखस, बारीक रवा घालून घ्यावा. २. आता हे सगळे जिन्नस साजूक तुपामध्ये खरपूस भाजून घ्यावेत. ३. त्यानंतर त्यात किसलेलं सुक खोबरं घालावं. आता हे सगळे जिन्नस साजूक तुपावर खमंग, खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावेत. 

चकली भाजणी करण्याचे हे घ्या परफेक्ट प्रमाण ! चकली चुकूनही बिघडणार नाही, फसणार नाही...

शनिवार - रविवारची सुटी म्हणून सगळा फराळ एकाचवेळी करता ? ९ टिप्स - फराळ होईल सुटसुटीत - बिघडणारही नाही...

४. सगळ्यात शेवटी या मिश्रणात पिठी साखर व वेलची पूड घालून घ्यावी. ५. हे सगळे जिन्नस चमच्याने ढवळत एकजीव करुन या मिश्रणाला खरपूस चॉकलेटी रंग येईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे.  अशाप्रकारे आपण झटपट होणारे खमंग, खुसखुशीत करंजीचे सारण घरच्या घरी बनवू शकता. 

करंजी बनवताना लक्षात ठेवा... 

१. करंज्या खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळण्याआधी मोहन तुपाचे घालावे आणि थंड झाल्यावर पीठ चांगले मळून घ्यावे. २. करंजीच्या आवरणासाठी भिजवलेले पीठ कडक होऊ नये यासाठी पीठ भिजवल्यानंतर सुती ओला कपडा त्यावर ठेवावा. ३. करंज्या अनेकदा तेलात फुटतात. यासाठी त्यांच्या कडांना कापसाच्या बोळ्याने दूध लावून काठ घट्ट बंद करावेत. ४. करंज्या नेहमी मंद आचेवर तळाव्यात. पीठ मळताना आधी मोहन, मीठ, पाणी नीट फेसून घ्यावे, नंतरच त्यात मैदा घालावा. ५. करंजीच्या सरणातील पिठी साखर कोरडी असावी. पिठीसाखरेला ओलसरपणा असेल तर त्याला वास येण्याची शक्यता असते.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृती