डोसा (Dosa) हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. पण डोसा बनवयचा म्हटलं की तांदूळ, डाळ भिजवा, वाटा, दळा इतकी मोठी प्रोसेस करावी लागते. ही प्रोसेस न करता डोसा बनवणं अगदी सोपं आहे. (Cooking Hacks & Tips) मॅगी सर्वांनाच खायला आवडते. मॅगी नुडल्सचा वापर करून तुम्ही कुरकुरीत, खमंग डोसा बनवू शकता. अगदी ५ ते ७ मिनिटांत हा डोसा बनून तयार होतो. मॅगी डोसा करण्यााची सोपी कृती पाहूया. (How To Make Maggie Dosa)
मॅगी डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
१) मॅगी- १ ते २ पाकीट
२) तांदूळाचे पीठ - ३ टेबलस्पून
३) रवा - १ टेबलस्पून
४) बारीक चिरलेला कांदा- १ ते २ टिस्पून
५) बारीक चिरलेला टोमॅटो - १ ते २ टिस्पून
६) हिरव्या मिरचीची पेस्ट- पाव टिस्पून
७) आल्याची पेस्ट- पाव टिस्पून
८) रेड चिली फ्लेक्स- अर्धा टिस्पून
९) मीठ - चवीनुसार
१०) मॅगी मसाला- १ ते २ टिस्पून
११) बारीक चिरलेली कोथिंबीर - १ ते २ टिस्पून
१२) पाणी - ३ कप
१३) तेल किंवा बटर- गरजेनुसार
मॅगी डोसा करण्याची खास रेसिपी (Instant Maggie Dosa Recipe)
१) सगळ्यात आधी मॅगीचे पाकीट उघडून हे कच्चे नुडल्स मिक्सरच्या भांड्यात घाला. मिक्सरमध्ये फिरवून नुडल्सची बारीक पावडर करून घ्या. त्यात २ चमचे रवा, २ चमचे तांदूळाचे पीठ घाला, १ चमचा बारीक चिरलेला कांदा, १ चमचा बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा आल्याची पेस्ट, एक चमचा रेड चिली फ्लेक्स, १ ते २ चमचे मॅगी मसाला, १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, हळूहळू पाणी घालून या मिश्रणाची पेस्ट बनवून घ्या. हे मिश्रण जास्त घट्ट असू नये. डोश्याच्या बॅटरप्रमाणे पातळ असावे.
नजर धुसर झाली-इच्छा नसताना चश्मा लावता? तुपात हा पदार्थ मिसळून खा, चश्मा हटेल-दृष्टी तीक्ष्ण
२) एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम किंवा बटर करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात चमच्याच्या साहाय्याने डोश्याचे बॅटर घाला आणि गोलाकार पसरवा. झाकण न ठेवता ५ मिनिटं डोसा शिजू द्या.
पोट कमीच होत नाही-पूर्ण शरीर बेढब झालं? नियमित २ पदार्थ पाण्यासोबत घ्या, झरझर घटेल चरबी
३) डोसा छान कुरकुरीत झाल्यानंतर सर्व बाजूंनी काढू शकता. तयार आहे खमंग मॅगीचा डोसा. सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी हा मस्त पदार्थ आहे. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा डोसा झटपट तयार होईल.