सणवार म्हटलं की प्रत्येक घरात होणारा हमखास बेत म्हणजे पुरी. एखादा खास प्रसंग, सणवार, कार्यक्रम, समारंभ असला की जेवणाच्या ताटात पुरी - भाजी हा मेन्यू ठरलेलाच असतो. दिवाळीतील पाडवा, भाऊबीज यांसारख्या सणांना प्रत्येक घरात पुऱ्या (Masala Puri) केल्या जातात. पुरीसोबत श्रीखंड, किंवा गोडी बटाट्याची भाजी किंवा एखादी रस्सेदार भाजी असतेच. परंतु, या खास सणाला नेहमीच्या त्याच त्या पुऱ्या करण्यापेक्षा, या नेहमीच्या पुऱ्यांना थोडासा ट्विस्ट देत आपण मसाला पुरी करु शकतो(Make Masala Puri from Wheat Flour).
मसाला पुरीची रेसिपी अगदी सोपी आहे नेहमीच्या पुऱ्या करतो अगदी तशीच फक्त यात काही मसाले घालावे लागतील इतकच. आणि तुमच्या खमंग, लुसलुशीत, टम्म फुगलेल्या पुऱ्या खाण्यासाठी तयार. या मसाला पुरी तुमच्या खास दिवसाच्या जेवणाची रंगत अजूनच वाढवतील. या पुऱ्या आपण फक्त खास प्रसंगी किंवा सणावाराला नाही तर ऐरवी देखील चहासोबत खाऊ शकतो. या मसाला पुऱ्या नेमक्या कशा करायच्या त्याची सोपी रेसिपी पाहूयात. यंदाच्या पाडवा - भाऊबीज यांसारख्या खास सणांना या मसाला पुऱ्यांचा अनोखा बेत नक्की ट्राय करुन पाहाच(How To Make a Masala Puri At Home For Padva & Bhaubij).
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - २ कप२. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ३. हळद - १/२ टेबलस्पून ४. धणे पूड - १ टेबलस्पून ५. ओवा - १/२ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार ७. पाणी - गरजेनुसार ८. तेल - तळण्यासाठी
एवढ्या मेहनतीने फराळाचे पदार्थ केले आणि ते लवकर खराब झाले तर? ५ गोष्टी करा, ना चव बदलेल-ना रंग...
फराळात विकतसारख्या आलू भुजिया करण्याची झटपट सोपी रेसिपी, कुरकुरीत-चटपटीत आलू भुजिया होतील फस्त!
कृती :-
१. एका मोठ्या परातीमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात लाल मिरची पावडर, हळद, धणे पूड, ओवा आणि चवीनुसार मीठ घालावे. २. हे सगळे जिन्नस गव्हाचे पिठात मिसळून एकजीव करुन घ्यावेत. ३. आता गरजेनुसार पाणी घालून नेहमीप्रमाणे पुऱ्यांचे पीठ मळतो तसे मळून घ्यावे.
४. पीठ मळून झाल्यावर यावर कपडा घालून १० ते १५ मिनिटे पीठ झाकून ठेवावे. ५. त्यानंतर या तयार पिठाचे मोठे गोळे करुन ते चपातीप्रमाणे लाटून घ्यावे. मग वाटीच्या मदतीने या लाटलेल्या चपातीवर गोलाकार छाप पडून पुऱ्या काढून घ्याव्यात. ६. एका कढईत तेल गरम करुन घ्यावे. या गरम तेलात पुऱ्या हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्याव्यात.
गरमागरम मसाला पुरी खाण्यासाठी तयार आहे. या मसाला पुरी आपण श्रीखंड किंवा सुकी आणि ग्रेव्ही असणाऱ्या भाजीसोबत खाऊ शकता. याचबरोबर, संध्याकाळच्या टी टाइम स्नॅक्सच्यावेळी गरम चहासोबत देखील या पुऱ्या खायला अधिकच टेस्टी लागतात.