Lokmat Sakhi >Food > वाफाळत्या गरमागरग खांदेशी चवीच्या ज्वारीच्या कण्या खाणं म्हणजे सुख! बालपणाच्या आठवणींत रंगलेली पारंपरिक रेसिपी

वाफाळत्या गरमागरग खांदेशी चवीच्या ज्वारीच्या कण्या खाणं म्हणजे सुख! बालपणाच्या आठवणींत रंगलेली पारंपरिक रेसिपी

How to make a traditional khandesh special Maharashtrian dish- jwarichya kanya- Millet special dish,one dish meal - lokmat sakhi food contest खांदेशी चवीच्या पारंपरिक ज्वारीच्या कण्या म्हणजे मोजक्या जिन्नस वापरुन चविष्ट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 11:13 AM2023-07-26T11:13:20+5:302023-07-26T11:14:18+5:30

How to make a traditional khandesh special Maharashtrian dish- jwarichya kanya- Millet special dish,one dish meal - lokmat sakhi food contest खांदेशी चवीच्या पारंपरिक ज्वारीच्या कण्या म्हणजे मोजक्या जिन्नस वापरुन चविष्ट पदार्थ

How to make a traditional khandesh special Maharashtrian dish- jwarichya kanya- Millet special dish,one dish meal - lokmat sakhi food contest | वाफाळत्या गरमागरग खांदेशी चवीच्या ज्वारीच्या कण्या खाणं म्हणजे सुख! बालपणाच्या आठवणींत रंगलेली पारंपरिक रेसिपी

वाफाळत्या गरमागरग खांदेशी चवीच्या ज्वारीच्या कण्या खाणं म्हणजे सुख! बालपणाच्या आठवणींत रंगलेली पारंपरिक रेसिपी

हेमांगी गोखले (नाशिक)

भरड धान्याची म्हणजे मिलेट्सची सध्या चर्चा आहे तर त्यामुळे लहानपणी आई-मावशी करत असलेल्या भरड धान्याच्या चविष्ट व खास पदार्थाची आठवण झाली. आई विदर्भात तर मावशी खांदेशात. तेथे विपूल व स्वस्त मिळणाऱ्या ज्यारीशिवाय जेवण, विशेषत: रात्रीचे जेवण तर होतच नसे. मामा मंडळी आली की ज्वारीच्या विविध पदार्थांची मेजवानीच होत असे. आत्ताच्या फास्ट फूडपेक्षा कैक पटींनी चविष्ट व स्वस्तही असे.

जळगाव-नागपूर प्रवास करतात तर प्रवासात चकल्या-सांडगे पापड या पदार्थांची चंगळ असे. कुरकुरीत व खुसखुशीत पदार्थ खात गप्पांमध्ये आपले स्टेशन कधी येई ते ही कळत नसे. तेव्हाच्या अनारक्षित प्रवासात जागा पटकावणे, खिडकीत बसणे हे सारं अप्रूप होतं. त्याच अप्रूपातला एक पदार्थ म्हणजे ज्वारीच्या चण्या. अविस्मरणीय व चविष्ट पौष्टिक पदार्थ(How to make a traditional khandesh special Maharashtrian dish- jwarichya kanya- Millet special dish,one dish meal - lokmat sakhi food contest).

ज्वारीच्या कण्या कशा करायच्या?

साहित्य

ज्वारीच्या कण्या १ वाटी, कांदा, टमाटा, गाजर १, अर्धी वाटी माटरचे दाणे, अर्धी वाटी मक्याचे दाणे, अर्धी वाटी भिजलेले शेंगदाणे व हरबरा डाळ, जिरे, हळद, हिंग, तेल, मिरची, कडीपत्ता, कोथिंबिर, लिंबू, खोबरे किस व चवीला साखर.

दही-कांदा एकत्र खावा का? दह्यात कांदा घालून खाल्ला तर पचन बिघडतं की सुधारतं?

कृती

प्रथम ज्वारीच्या कण्या कोरड्या भाजून घ्याव्यात. त्यानंतर भिजत ठेवाव्यात. तेलाची जिरे घालून फोडणी करावी. त्यात हिंग हळद मिरची कढीपत्ता, दाणे, हरबऱ्याची डाळ टाकून कांदा घालावा. गुलाबी रंगावर सारे परतून घ्यावे. त्यात मग टमाटे, मक्याचे दाणे, गाजर, मटार एकत्र करुन एकजीव शिजवून घ्यावे.

हिरव्या मुगाची वरणफळं! तोंडाला पाणी सुटेल ‘असा’ अस्सल पारंपरिक पदार्थ, प्रोटीन डाएटसाठी परफेक्ट

त्यात मसाल्यात ज्वारीच्या कण्यात टाकून पाण्याचा हबका देवून शिजवावे. चवीला मिठ साखर लिंबू घालावा. हे मिश्रण छान शिजल्यावर मोकळे करुन त्यावर कोथिंबीर खोबरं किंवा नारळ घालावं. मस्त गरम गरम कण्या खाव्या.

Web Title: How to make a traditional khandesh special Maharashtrian dish- jwarichya kanya- Millet special dish,one dish meal - lokmat sakhi food contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.