शोभना कनसकर (कोपरखैरणे-ठाणे)
दोडक्याची भाजी अनेकांना अजिबात आवडत नाही. मात्र दोडका अतिशय पौष्टिक. त्यामुळे भाजी न करता दोडक्याचे मुठे करुन पाहा. पारंपरिक, करायला सोपा, व रुचकर पदार्थ आपण प्रवासात नेऊ शकतो. एरव्ही नाश्ता म्हणून पण खाऊ शकतो. पोटभरीचा नाश्ता होतो. सगळे साहित्य आपल्या घरात असतेच. ही कृती सहसा केली जात नाही पण आठवणीने करावी, जपावी अशी आहे (Dodka silk gourd Chinese okra muthe Easy and Testy Recipe).
दोडक्याचे मुठे कसे करायचे?
साहित्य -
ताजे दोडके पाव किलो, गव्हाचे पीठ १ वाटी, आलं लसूण पेस्ट १ चमचा, मोहरी, जिरे, ओवा, साखर १ चमचा, धणे जिरे पूड १ चमचा, लाल तिखट- आमचूर पावडर अर्धा चमचा, हिंग, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, मीठ चवीनुसार
कृती -
१. प्रथम १ वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात दोनचमचे तेल, ओवा, लाल तिखट, हळद व मीठ घालून मिक्स करणे.
२. नंतर थोडे थोडे पाणी घालून भिजवावे. तयार कणीक घेऊन त्याला वाटीसारखा आकार देणे म्हणतेच मुठे तयार करणे .
३. दोडके स्वच्छ धुवून शिरा काढून त्याच्या फोडी करणे.
४. नंतर एका कढईत तेल घेऊन त्यात जिरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट, हिंग, धने जिरे पूड, चवीनुसार साखर,
५. आमचूर पूड, मीठ व दोडके घालून परतणे. त्यात मुठे पण घालणे.
६. नंतर झाकणीवर पाणी ठेवून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजू देणे.
७. तयार दोडक्याच्या मुठ्यावर कोथींबीर घालून सर्व्ह करणे. अतिशय चविष्ट लागतो हा पदार्थ.