Join us  

हिरव्या मुगाची वरणफळं! तोंडाला पाणी सुटेल ‘असा’ अस्सल पारंपरिक पदार्थ, प्रोटीन डाएटसाठी परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 7:15 PM

Green beans! A mouth-wateringly authentic al dish, perfect for a protein diet वरणफळं आपण नेहमी खातो पण तुम्ही कधी हिरव्या मुगाची वरणफळं खाल्ली आहेत का?

दुर्गा तेजस आचार्य (छत्रपती संभाजीनगर)

वरण फळं तर घरोघरी केले जातात. अर्थात सध्याच्या पिढीला हा पदार्थ बहुतेक माहीत नसावा. आणि त्यामध्ये देखील खूप सारे वेगवेगळी वरणफळं करता येतात हे मला देखील खूप उशिरा माहित झाले. जसे तुरीची डाळ, मठाची डाळ, किंवा रात्रीच्या राहिलेल्या वरणाच्या देखील कांदा टोमॅटो घालून वरणफळ करता येतात. मात्र हे आहेत हिरव्या मुगाचे वरणफळं.

हिरवे मूग आपल्या आहारात खूप पौष्टिक मानले जातात. त्यापासून हिरव्या मुगाचे लाडू, मुगाला मोड आणून उसळ किंवा तसेच मोड आलेल्या मुगापासून सॅलेड किंवा हिरव्या मुगाचे डोसे देखील बनवतात. पण माझ्या सासूबाईंनी शिकवलेला हा पदार्थ अगदी वीस ते तीस मिनिटात होणारा असून लगेच पोटभर जेवल्याचा आनंद मिळतो. त्यासाठी हिरवे मूग वगळता विशेष अशा कोणत्याच गोष्टीची गरज पडत नाही(Green beans! A mouth-wateringly authentic al dish, perfect for a protein diet).

कसे करतात हिरव्या मुगाची वरणफळं

साहित्य :-

१ वाटी हिरवे मूग, १ वाटी गव्हाचे पीठ, हिरवी मिरची - आले- लसूण - कढीपत्ता पेस्ट, जिरे, मोहरी, हिंग ,हळद, मीठ, आवश्यकतेनुसार तेल, कोथिंबीर, तसेच चवीपुरतं चिंच व गूळ इत्यादी.

मूठभर शेंगदाण्याची करा झणझणीत ओली चटणी! इडली-डोसा-पराठ्यांसोबत अशी चटणी म्हणजे नाश्ता फक्कड

कृती : -

सर्वप्रथम कच्चे हिरवे मूग चांगले भाजून कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून एक ते दोन शिट्टी घेऊन चांगले शिजवून घ्यावे. त्यानंतर पोळीसाठी जशी कणीक मळून घेतो, तशी गव्हाच्या पिठाची कणीक मळून घ्यावी.

खमंग खुसखुशीत खांदेशी बट्टी करण्याची सोपी रेसिपी, होऊन जाऊ द्या डाळ बट्टीचा मस्त बेत

आता एका कढईमध्ये फोडणीसाठी थोडे तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता, हिंग व हळद टाकावी. तसेच हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट हे देखील चांगले परतून घ्यावे. ते परतून झाल्यावर लगेच त्यामध्ये कुकर मधील शिजवलेले हिरवे मूग कुकर मधील सर्व पाण्यासह फोडणीमध्ये टाकावे. गरज वाटल्यास अजून पाणी टाकावे. व त्याला चांगले उकळू द्यावे. तसेच त्यात चिंच, गुळ व मीठ देखील टाकावे.

आत्ता मळलेल्या कणकेची पोळपाटावर पोळी लाटून त्याचे शंकरपाळ्यासारखे छोटे मोठे काप करावे. व उकळत असलेल्या फोडणीमध्ये टाकावे. अशा पद्धतीने सर्व कणकेचे काप करून फोडणी मध्ये टाकावे. व मध्ये मध्ये हिरव्या मुगाचे मिश्रण चांगले हलवावे. तसेच हिरवे मूग कुकरमध्ये शिजवून घेतले, असल्यामुळे वरण फळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये चांगले शिजते.

हिरवे मूग आणि कणकेचे काप यामुळे वरणफळला चांगला घट्टपणा व हिरवा रंग देखील येतो. त्यावर कोथिंबिर घाला. आता वरण फळं खाण्यासाठी तयार. चांगले तूप टाकून लोणच्या सोबत खाण्यासाठी वरणफळ अगदी उत्तम लागते.

टॅग्स :पाककृती 2023अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स