Join us  

अस्सा पदार्थ सुरेख बाई ! ‘झाकले माणिक’ नावाचा पारंपरिक पदार्थ, प्रोटीनचा खजिना-खाऊन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 4:12 PM

How to make a traditional Maharashtrian dish- zakale Manik- protein special recipe for breakfast, on dish meal lokmat sakhi food contest : झाकले माणिक नावाचा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ, प्रोटीन डाएटसाठी परफेक्ट रेसिपी...

वर्षा दोभाडा, पुणे

झाकले माणिक. हेच नाव आहे रेसिपीचं. रेसिपीप्रमाणेच नावही अर्थपूर्ण आहे. माझी आई ही रेसिपी करायची आणि मलापण हा पदार्थ खूप आवडायचा. आता माझ्या मुलाांना खूप आवडतो. मुलाांना स्टार्टर, चाट यासारखे चटपटीत पदार्थ खूप आवडतात. मुलांना प्रोटीनची खूप गरज असते. सगळ्यानंचा हे झाकलं माणिक खूप आवडते. कढीबरोबर खाल्ले तर मस्त वन डिश मिल होते(How to make a traditional Maharashtrian dish- zakale Manik- protein special recipe for breakfast, on dish meal lokmat sakhi food contest).

झाकले माणिक करायचे कसे ?

साहित्य :- भाजणीचे पीठ दिड वाटी, मोड आलेली कडधन्य १ वाटी (मुग, मसूर, मटकी,हुलगे, हरबरा), लाल तिखट,मीठ, तीळ, ओवा , कोथिंबीरमिरची आलू लसूण पेस्ट १ चमचा, ओले खोबरे१ चमचा,साखर पाव चमचा, लिंबू रस, चिरलेले गाजर, एक छोटा कांदा, टमाटा

कढीसाठी :- ताक २ वाट्या, डाळीचे पीठ २ चमचे, तूप,जीरे, मेथीचे दाणे, कडीपत्ता.

कृती :- दीड वाटी भाजणी पिठाएवढेच पाणी गरम करावे. यात १ चमचा तेल, मीठ, तिखट, ओवा, तीळघालून याची उकड काढावी. मोड आलेली कडधान्ये वाफवून घ्यावीत. जाडसर मिक्सरमधून काढावीत.२चमचे तेल गरम करावे. यात जीरे, मिरची आलं लसूण पेस्ट, मिक्सरमधून काढलेली कडधान्ये घालावीत.यात मीठ,साखर, कोथिंबीर, लिंबू रस, गाजर घालावे. हे झाले स्टफिंग तयार. यात आपण कोबी, फरसबी,मका, पालेभाजी पण घालू शकतो. भाजणीची उकड छान मळून त्यात हे सारण भरावे. त्याची टिक्की करावी.हे झाले झाकणे माणिक परत पाच मिनिटे वाफवावेत. त्यावर शेंगदाणा तेल लावनू चिमुटभर लाल तिखटभुरभुरावे. काही तळूनहीे खाता येतील. ते कढीसोबत खावे. काही डीपफ्राय करावे. हे कढी सोबत द्यावे. सॅलेडही करावे.कडधान्ये वाफवून आधी ठेवली तर दहा मिनिटांत ही रेसिपी तयार होते.अतिशय उत्तम पोेषण मूल्य असलेला हा पदार्थ . नक्की करुन टाका.

टॅग्स :पाककृती 2023अन्नपाककृती