थंडीचा महिना सुरु झाला की, आपल्याला भूक अधिक प्रमाणात लागते. (popti recipe) या काळात सतत काहीतरी चटपटीत पण चवदार पदार्थ खावेसे वाटतात. हिवाळ्यात भाज्या खूप छान मिळतात. ज्यामुळे आपण अनेक पदार्थ बनवून त्याची चव चाखतो. (aagri style popti) बाजारामध्ये आपल्याला ज्वारीचा हुरडा, हिरवी वांगी, पोपटी, वालपापडी, कोनफळं, लाल मिरच्या आपल्याला सध्या पाहायला मिळत असतीलच. (winter special food) हिवाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पोपटी पार्टीचा बेत आखला जातो. खेड्यापाड्यात किंवा गावच्या ठिकाणी होणाऱ्या पोपटी पार्टीबद्दल कधी ना कधी तरी ऐकलेच असेल. कोकणातील आणि रायगडमधील लोकांना याविषयी अधिक प्रमाणात माहिती आहे.
Tummy Traveller या फूड ब्लॉगरने रायगडची आगरी पद्धतीची पोपटी ठाण्यात मिळणार आहे अशी पोस्ट केली. पण पोपटी म्हणजे काय? हा पारंपारिक पदार्थ बनतो कसा? रायगड जिल्ह्यातील पारंपारिक पदार्थ म्हणजे पोपटी. (Winter popti party) हिवाळ्यात येणाऱ्या भाज्या आणि अनेक मासांहरी पदार्थांचा समावेश असतो. परंतु, पोपटी ही शाकाहरी आणि मासांहरी या दोन्ही पद्धतीची मिळते. एकामध्ये फक्त सिझनल भाज्यांचा समावेश असतो तर मासांहरीमध्ये इतर पदार्थ घातले जातात. यात असणाऱ्या हिरव्यागार भाज्यांमुळे याला पोपटीचा रंग येतो. विदर्भ आणि खानेदशामध्ये ज्वारी आणि बाजरीची कणसे भाजून हुर्डा तयार करतात. थंडीच्या काळात हुर्डा पार्टीला देखील रंगत येते. जर तुम्हाला देखील पोपटीची चव चाखायची असेल आजच ट्राय करुन पाहा.
साहित्य
वालाच्या ताज्या शेंगा, मासांहरी पदार्थ, अर्धा किलो बटाटे, कांदे-वांगी (आवडीनुसार), सारणासाठी मसाला, जाडे मीठ, चवीपुरता ओवा, मध्यम आकाराचं मातीचं मडकं, शेवग्याच्या शेंगा,गाजराचे तुकडे,चिंचेचा कोळ, जिरं, दालचिनी, लवंग ,काळीमिरी ,लाल तिखट ,तमालपत्र,पुदिना, तेलभांबुर्डीचा पाला व लाकडं किंवा गोवऱ्या
कृती
- पोपटी बनवण्यासाठी मातीचे मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून घ्या. मडक्याच्या तळाशी सर्वात आधी भांबुर्डीच्या पाल्याचा थर व्यवस्थित परसवा. त्यावर शेंगा, मासांहरी पदार्थ, कांदे- बटाटे आणि वांगी ठेवावीत.
- यानंतर त्यात थोडासा ओवा आणि मीठ घालावे. पुन्हा भांबुर्डीचा पाला ,सारणाचा मसाला व उरलेले सर्व पदार्थ पसरवून घ्या. मडक्याचे तोंड पाल्याने बंद करा.
शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची आहे? नक्की ट्राय करुन पाहा बाजरीचे सूप, पौष्टिक आणि चविष्ट
पोपटी लावण्याची पद्धत :
मडक्यापेक्षा मोठा खड्डा खणावा, त्यात थोडा सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून मडकं त्यावर उलटं ठेवा. मडक्याभोवती सुकी लाकडे, सुकलेला पाला पाचोळा, सुकलेल्या गोवऱ्या व्यवस्थित लावून पेटवून घ्या. अर्धा किंवा पाऊण तासात हे मिश्रण शिजेल.
टिप : पोपटीसाठी लागणारा भांबुर्डीचा पाला नसेल तर केळीच्या पानाचा वापर करु शकता.