Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात करा आंबा पोळी; साठवून ठेवा आंब्याची चव, वर्षभर टिकेल-अजिबात दातांना चिकटणार नाही

उन्हाळ्यात करा आंबा पोळी; साठवून ठेवा आंब्याची चव, वर्षभर टिकेल-अजिबात दातांना चिकटणार नाही

How to make Aam Papad : आंबापोळी चवीला उत्तम, खायला चवदार असते. पण घरी बनवलेली आंबापोळी दातांना चिकटते तर कधी, लवकर खराब होते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:10 AM2023-04-29T11:10:00+5:302023-04-29T14:38:37+5:30

How to make Aam Papad : आंबापोळी चवीला उत्तम, खायला चवदार असते. पण घरी बनवलेली आंबापोळी दातांना चिकटते तर कधी, लवकर खराब होते

How to make Aam Papad : Aam Papad Recipe | उन्हाळ्यात करा आंबा पोळी; साठवून ठेवा आंब्याची चव, वर्षभर टिकेल-अजिबात दातांना चिकटणार नाही

उन्हाळ्यात करा आंबा पोळी; साठवून ठेवा आंब्याची चव, वर्षभर टिकेल-अजिबात दातांना चिकटणार नाही

उन्हाळ्याच्या दिवसात ताजे आंबे बाजारात दिसतात. आंबे खाण्यासाठी लोक उन्हाळ्याची आतूरतेनं वाट पाहतात. आंबे स्वयंपाकात अनेक पदार्थ बनवण्यासाठी वापरले जातात. (Aamba Poli Recipe)  जसजसं की आंबेडाळ, कैरीची भाजी, लोणचं, पन्ह, बर्फी, आम रस, इत्यादी. आंब्यापासून तयार होणारी आंबावडी, आंबापोळी सर्वांनाच आवडते.(Aam Papad  Recipe)

आंबापोळी चवीला उत्तम, खायला चवदार असते. पण घरी बनवलेली आंबापोळी दातांना चिकटते तर कधी, लवकर खराब होते अशी अनेकींची तक्रार असते. परफेक्ट चवदार आंबा पोळी बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (How to make aamba poli at home) 

सगळ्यात आधी आंब्याचे बारीक काप करून घ्या. हे काप मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यात साखर घाला. एक  कढईत चमचाभर तूप घालून त्यात आंब्याचं मिश्रण घालून ढवळा त्यात २ चमचे वेलची पूड घाला. एका ताटाला तेल लावून त्यात हे मिश्रण घाला.  कडक उन्हात दोन दिवस सुकवल्यानंतर हे पापड व्यवस्थित सुरीनं व्यवस्थित काढून घ्या. उभ्या लाईन्स आंब्याच्या पोळीवर बनवून त्याचे रोल्स करून घ्या तयार आहे आंब्याची पोळी.

आंबापोळी बनवण्याची दुसरी पद्धत ?

सर्व प्रथम आंबा सोलून त्याचे दाणे काढून त्याचा गर काढा. आता मिक्सरमध्ये घालून  बारीक करा. आता एक कढई ठेवा आणि त्यात तूप गरम करा. ते गरम झाल्यावर त्यात आंब्याचा कोळ, साखर, वेलची पूड घालून चांगले शिजू द्यावे. किमान 10 मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा. 

यानंतर, आपण हे मिश्रण तूप लावून मोठ्या प्लेटवर पसरवू शकता किंवा आपण स्वच्छ प्लास्टिकच्या शीटवर पसरवू शकता. यानंतर उन्हात ठेवा. ते एका बाजूला चांगले सुकल्यावर दुसऱ्या बाजूला उलटा. तुमचा आंब्याचा पापड तयार आहे.

Web Title: How to make Aam Papad : Aam Papad Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.