अक्षय्य तृतीयेला घरोघरी आंब्याचा रस केला जातो. बऱ्याच घरांमध्ये तर अक्षय्यतृतीयेपासूनच आंबा आणि आंब्याचे पदार्थ खायला सुरुवात केली जाते. आमरसापासून तयार केलेले आम्रखंड हा बहुतांश लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ (aamrakhand recipe). श्रीखंड तर आपण नेहमीच खातो. पण सध्याच्या दिवसांतच ताज्या ताज्या आंब्याच्या रसापासून तयार केलेले आम्रखंड खाण्याची संधी मिळते. म्हणूनच आता तुम्हालाही अक्षय्य तृतीयेला किंवा इतर कोणत्या दिवशी आम्रखंड करून पाहायचं असेल, तर ही आम्रखंड तयार करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी पाहून घ्या (how to make aamrakhand at home?). अगदी १० मिनिटांत ५- ६ वाट्या आम्रखंड तयार होईल.... (simple and easy recipe of making aamrakhand in few minutes)
आम्रखंड तयार करण्याची रेसिपी
साहित्य
५ ते ६ वाट्या दही
१ वाटी आंब्याचा रस
उन्हाळ्यात घाम येऊन चेहरा जास्तच ऑईली- चिपचिपित होतो? मुलतानी मातीसोबत लावा 'हे' ३ पदार्थ
पिठीसाखर
२ टेबलस्पून बदाम, काजू यांचे तुकडे
कृती
सगळ्यात आधी दही एका सुती कपड्यात अगदी घट्ट बांधून घ्या. त्यानंतर हाताने दाबून दाबून त्या दह्यातलं सगळं पाणी काढून टाका.
आता आपण तयार केलेला चक्का एका भांड्यात काढा. त्यामध्ये पिठीसाखर घाला. पिठी साखर घातल्याने श्रीखंड आणखी झटपट होतं. त्यामध्येच आता आमरस घाला. आमरस मिक्सर किंवा हॅण्डमिक्सरने फेटून घ्या. जेणेकरून तो अगदी मऊसूत होईल.
यानंतर व्हिस्कच्या साहाय्याने सगळं मिश्रण हलवून घ्या. ते एका भांड्यात काढून घ्या आणि वरतून काजू- बदाम- मनुका यांचे तुकडे टाकून सजवून घ्या.
काही जणांना आम्रखंडात इतर कोणताच फ्लेवर आवडत नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात केशर किंवा वेलची पूड टाकूनही खाऊ शकता.