फळांचा राजा आणि जगभरात सगळ्यांच्याच आवडीचे फळ असणाऱ्या आंब्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. आंब्याचा सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारा पदार्थ म्हणजे आमरस. पिकलेल्या हापूस आंब्यांपासून आंबा आईस्क्रीम, आंबा शिरा, आंबा बर्फी, आंबा ज्यूस, आंबा मिल्कशेक असे असंख्य पदार्थ बनवले जातात. आंब्याच्या सिजनमध्ये प्रत्येक घराघरांत आंब्याचा आमरस हमखास बनवण्यात येतो. आमरस हा एक असा गोड पारंपरिक पदार्थ आहे की जो उन्हाळयात बनवून आवडीने खाल्ला जातो. आमरस हा शक्यतो गरमागरम पुरी, पुरणपोळी, चपातीसोबत आवडीने खातात. आमरस जेवणाची आमंत्रणही दिली जातात.
आमरस हा इतका जगप्रसिद्ध लोकप्रिय पदार्थ आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच पसंतीस पडतो. आमरस बनवायची अशी काही विशेष पाककृती नाही. प्रत्येकजण स्वतःला करायला जी सोपी वाटेल अशा पध्दतीने आमरस बनवतो. आंबा हे असे एक फळ आहे की जे वर्षभरातून एकदाच खायला मिळते. आंबा हा ठराविक हंगामापुरताच मर्यादित असतो. त्यामुळे या काळात जितका आंबा खाता येईल तितका आंबा आपण खातोच. परंतु हा आंबा आपल्याला वर्षभर खाता यावा अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. यासाठी आपण काही सोप्या ट्रिक्स वापरुन आंबा वर्षभरासाठी स्टोअर करुन ठेवू शकतो. झटपट आमरस कसा तयार करायचा? कारण आंब्याचा रस करणं हे तसं वेळखाऊ काम असतं. कुणाकुणाला ते आवडतही नाही, आयता रस खायला आवडत असले तरीही(How To Make Aamras At Home : Aamras Recipe).
अस्सल देवगड 'हापूस' कसा ओळखाल? ६ टिप्स, पैसे मोजताय तर घ्या अस्सल आंबा...
काहीजण आता आंब्याचा रस मिक्सरमधून काढून खातात. तर काहींना आंबा रस गुठळ्या असलेलाच आवडतो. कुणी त्यात मीठ घालते किंचित, कुणी दूध साखर, कुणी तूप. तर कुणी काहीच नाही. ज्याची त्याची आवड.पण जर झटपट आंब्याचा रस काढायचा असेल तर काय करायचं पहा.
१. सर्वप्रथम, आमरस करण्याआधी आंबे किमान अर्धा तास स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत.२. अर्धा तास आंबे पाण्यात भिजवून घेतल्यानंतर आंब्याची साल काढावी.३. आंब्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. ४. आता एका मिक्सरच्या भांड्यात आंब्यांचे तुकडे, दूध, साखर, वेलची पूड घालूंन हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये एकत्रित बारीक करुन घ्यावे.
शहाळ्याचं पाणी आणि मलईचं गारेगार मिल्कशेक पिऊन तर पाहा, उन्हाळा आवडायला लागेल...
अर्थात तुम्हाला मिक्सरमध्ये केलेला आंब्याचा रस आवडत असेल तरच हा रस आवडेल पारंपरिक आंब्याचा रस आवडत असेल तर नाही, हे ही खरे.