Join us  

आमरस करणं किचकट काम वाटतं? इन्स्टंट आमरसाची पाहा सोपी कृती; ५ मिनिटात पातेलंभर रस..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2024 3:38 PM

how to make aamras | mango puree : आमरस काळा पडू नये म्हणून स्टोर करताना लक्षात ठेवा ४ टिप्स - आमरस टिकेल भरपूर दिवस

उन्हाळा म्हटलं की, अनेकांच्या डोळ्यासमोर आंबा येतोच. भर उन्हाळ्यात दुपारी गावाकडचे आंबे खाण्याची मज्जा काही औरच आहे. गुढीपाड्व्यानंतर (Gudhi Padhava) बाजार आंब्यामुळे सोनेरी रंगाने बहरतो (Aamras). रसाळ आंबा खाण्यासाठी आंबाप्रेमी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आंब्याचा सिझन सुरु होताच आपण आंब्याची पेटी आणतो (Cooking Tips). काही आंबे सोलून खातात तर, तर काही आंब्याच्या फोडी तयार करून खातात. तर काही आंब्यापासून आमरस, आम्रखंड, आंब्याची वडी असे पदार्थ तयार करतात.

आज गुढीपाडवा. या दिवशी आमरस पुरीचा खास बेत आखला जातो. काही लोक एकावेळेस ४ ते ५ वाट्या आमरस पिऊन फस्त करतात. पण काहींना घरात आमरस तयार करणे किचकट काम वाटते. जर आपल्याला घरीच इन्स्टंट पद्धतीने आमरस तयार करायचं असेल तर, या रेसिपीला फॉलो करून पाहा. काही मिनिटात गोडसर आमरस तयार होईल(how to make aamras | mango puree).

इन्स्टंट आमरस करण्यासाठी लागणारं साहित्य

आंबा 

साखर

गुढीपाडवा विशेष: अवघ्या ५ मिनिटात काढा गुढीची सुरेख रांगोळी; एक पळी घ्या अन् भोवतीने आकर्षक रंग भरा

दूध 

बर्फाचे तुकडे

कृती

सर्वप्रथम, पिकलेला आंबा थंड पाण्यात ठेवा. काही वेळानंतर आंबा धुवून घ्या. आता सुरीच्या मदतीने आंब्याची साल काढून घ्या, व सुरीने आंब्याच्या फोडी तयार करा किंवा गर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

आता मिक्सरच्या भांड्यात आंब्याच्या फोडी घ्या. त्यात २ चमचे साखर, कपभर दूध आणि बर्फाचे तुकडे घालून वाटून घ्या. तयार आमरस एका बाऊलमध्ये काढून घ्या, व त्यात चिमुटभर वेलची पावडर आणि चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.

अशा प्रकारे इन्स्टंट गोडसर आमरस खाण्यासाठी रेडी. आपण आमरस पुरी, किंवा असेच देखील खाऊ शकता.

आमरस काळपट पडू नये म्हणून..

आमरस केल्यानंतर काळपट पडतो, किंवा त्याची चव बिघडते. आमरस अधिक दिवस फ्रेश राहावे म्हणून आपण साठवताना काही टिप्स फॉलो करू शकता.

- आमरस केल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.

चांदीचे दागिने-पैंजण काळे पडलेत? एक भन्नाट ट्रिक-१५ मिनिटात चमकतील दागिने आणि भांडी

- आमरस तयार करताना त्यात मीठ घालू नका. फक्त आवडीनुसार साखर घाला.

- फ्रिजमध्ये आमरस स्टोर करून ठेवत असाल तर, काचेच्या डब्यात ठेवावे.

- रस काढताना संपूर्ण पिकलेल्या आंब्याचा वापर करावा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआंबासमर स्पेशल