रोजचा स्वयंपाक तयार करायला येणं हे खरंच कौशल्याचं काम. मुख्य म्हणजे योग्य प्रमाणात साहित्यांचा वापर करून पदार्थ करणं हे प्रत्येकाला लवकर जमलेच असे नाही. यासह भाकरी आणि चपाती शिकायला देखील अनेकांचा खूप वेळ जातो. भाकरी अनेकांना आवडते. भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
भाकरी करण्याचेही अनेक प्रकार आहेत. ज्वारी, तांदूळ, नाचणीची भाकरी आपण खाल्लीच असेल. पण अनेकांना आगरी पद्धतीची भाकरी करायला जमलेच असे नाही. टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत आगरी पद्धतीची भाकरी आपल्याला करायची असेल तर, ही पद्धत नक्की वापरून पाहा. या पद्धतीने भाकरी केल्यास पारंपारिक पद्धतीची भाकरी तयार होईल(How to make Agri style Bhakri).
आगरी पद्धतीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य
तांदुळाचं पीठ
पॅकेज्ड दूध तापवून-उकळवून पिणं चांगलं की पोटासाठी अपायकारक? अभ्यास सांगतो, दूध तापवले तर
पाणी
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात २ कप तांदुळाचं पीठ घालून चमच्याने मिक्स करा. अशा प्रकारे उकड तयार होईल. उकड तयार झाल्यानंतर एका परातीत काढून घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ छान मळून घ्या.
पीठ मळून झाल्यानंतर गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. मळलेल्या कणकेचा छोटा भाग घेऊन पुन्हा थोडं पाणी लावून मळून घ्या. व हाताने मळलेल्या पिठाला भाकरीचा आकार द्या. परातीला थोडं पाणी लावा, व भाकरी हळुवार हाताने थापून घ्या. दोन्ही हाताने भाकरी अलगदपणे उचलून गरम तव्यावर ठेवा, व हाय फ्लेमवर भाकरी दोन्ही बाजूने शेकून घ्या. अशा प्रकारे आगरी पद्धतीची पारंपारिक भाकरी खाण्यासाठी रेडी.