Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात खायलाच हवी आजी करायची तशी आलेपाक वडी, सर्दी खोकला राहतो लांब - पाहा रेसिपी...

पावसाळ्यात खायलाच हवी आजी करायची तशी आलेपाक वडी, सर्दी खोकला राहतो लांब - पाहा रेसिपी...

Ginger Candy Recipe : How to Make Ale Pak Vadi At Home : पावसाळ्यात वातावरणातील ओलावा आणि गारव्यामुळे अनेक आजार डोकं वर काढतात, त्यासाठीच आलेपाक वडीचा खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2024 07:00 PM2024-08-08T19:00:41+5:302024-08-08T19:08:39+5:30

Ginger Candy Recipe : How to Make Ale Pak Vadi At Home : पावसाळ्यात वातावरणातील ओलावा आणि गारव्यामुळे अनेक आजार डोकं वर काढतात, त्यासाठीच आलेपाक वडीचा खास उपाय...

How to Make Ale Pak Vadi At Home Ginger Candy Recipe | पावसाळ्यात खायलाच हवी आजी करायची तशी आलेपाक वडी, सर्दी खोकला राहतो लांब - पाहा रेसिपी...

पावसाळ्यात खायलाच हवी आजी करायची तशी आलेपाक वडी, सर्दी खोकला राहतो लांब - पाहा रेसिपी...

'आलं' हे आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते. यासाठीच आपण रोजच्या अनेक पदार्थांमध्ये आलं घालतो. रोजचा चहा किंवा वाटण करायचे म्हटले की हे आलं वापरलं जात. यानिमित्ताने आलं आपल्या पोटात जाऊन त्याचे गुणकारी फायदे आपल्या आरोग्याला मिळतात. याच आल्याचा वापर करुन आपण आलेपाक वडी देखील तयार करुन ठेवू शकतो. चवीला काहीशी तिखट, गोड असणारी ही आलेपाक वडी खाणे आरोग्यासाठी फारच उपयुक्त ठरते. बाजारांत सहज विकत मिळणारी ही आलेपाक वडी आपण घरच्याघरी देखील करु शकतो. अतिशय सोपी रेसिपी असणारी ही आलेपाक वडी आरोग्याच्या काही तक्रारींवर अतिशय उत्तम उपाय आहे(How to Make Ale Pak Vadi At Home).

पावसाळ्यात वातावरणातील ओलावा आणि गारव्यामुळे अनेक आजार डोकं वर काढतात. या ऋतूत सर्दी, (The Spicy Maharashtrian Sweet That Fights Cold And Cough) खोकला, ताप यांसारखे आजार वरचेवर होतात. याचबरोबर सांधेदुखी, बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात. या तक्रारींवर आलेपाक वडी खाणे हा उत्तम उपाय ठरू शकतो. हे अनेक लहान - सहान आजार बरे करण्यासाठी औषधे घेण्यापेक्षा आपण ही घरगुती आलेपाक वडी खाऊ शकतो. आलेपाक वडी घरच्या घरी करण्याची सोपी रेसिपी पाहुयात(How To Make Aale Pak).            

साहित्य :- 

१. आलं - २ कप 
२. साखर - ४ कप 
३. तूप - २ ते ३ टेबलस्पून 

पावसाळ्यात सतत चहा पिण्याची तलफ येते ? घ्या चहा प्रिमिक्सची फक्कड रेसिपी, टपरीवर चहाचा खर्चही वाचेल...


काहीतरी गोड खावेसे वाटते,  सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगते, १ सोपी रेसिपी - गोड आणि पौष्टीक...

कृती :- 

१. सगळ्यात आधी आलं स्वच्छ धुवून ते पुसून मग कोरडं करुन घ्यावे. त्यानंतर आल्याची सालं काढून घ्यावी. 
२. सालं काढून घेतलेलं आलं किसणीवर किसून बारीक करून घ्यावे. 
३. आलं किसून घेतल्यानंतर एका मोठ्या कढई हे किसलेलं आलं ओतावे. आता त्यात साखर घालावी. (जितके आलं घ्याल त्याच्या चौपट साखर घ्यावी). 
४. कढईतील साखर आणि आल्याचे मिश्रण व्यवस्थित चमच्याने हलवत राहावे. 
५. जोपर्यंत या मिश्रणाचा पातळ पाक तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण चमच्याने सारखे हलवत राहावे. 
६. आता एका मोठ्या डिशमध्ये तूप घेऊन हे तूप ताटात पसरवून संपूर्ण ताटाला तूप लावून घ्यावे. 

७. कढईच्या कडेला पाकातली साखर हळूहळू चिकटू लागली की समजावे आपला पाक तयार झाला आहे.
८. आता कढईतील आलं आणि साखरेचा पाक तूप लावलेल्या डिशमध्ये ओतून घ्यावा. 
९. हा पाक डिशमध्ये ओतल्यानंतर थोडावेळ गार होऊ द्यावा. ताटातील मिश्रण थोडे थंड झाल्यावर  त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. (पाक थोडा कोमट असतानाच वड्या पाडून घ्याव्यात, एकदम थंड झाल्यावर याच्या वड्या नीट पाडता येत नाहीत.)

आलेपाक खाण्यासाठी तयार आहे. या वड्या आपण काचेच्या हवाबंद बरणीत भरुन व्यवस्थित स्टोअर करुन ठेवू शकता.

Web Title: How to Make Ale Pak Vadi At Home Ginger Candy Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.