रोजच्या जेवणात साहसा आपल्याकडे एक सुकी व एक रस्सा भाजी असे भाजीचे दोन प्रकार असतात. यातील सुकी भाजी ही अतिशय झटपट बनून तयार होते. याउलट एखादी रस्सा किंवा ग्रेव्ही असणारी भाजी करायची म्हटलं की त्याचा खूप घाट घालावा लागतो. ग्रेव्ही असणारी भाजी करायची म्हटलं की त्याच्या ग्रेव्ही साठी वाटण - घाटण अशी मोठी प्रोसेस करावी लागते. परंतु प्रत्येकवेळी कामाच्या गडबडीत आपल्याला हे इतकं सगळं करण्यासाठी फारसा वेळ नसतो. याचसोबत जर घरची गृहिणी ही वर्किंग वुमन असेल तर रोज उठून वाटण करत बसणे हे शक्य होत नाही(Universal Gravy Base).
जर भाज्या बनवण्याची तयारी आधीच करून ठेवली असेल तर जास्त कष्ट न घेता पटापट स्वयंपाक (All Purpose Gravy Curry Base Recipe) तयार होतो. प्रत्येक भाजीसाठी वापरता येईल असा मसाला, ग्रेव्ही आधीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवली तर रोजचं काम सोपं होऊ शकतं. यासाठी आपण एकाच प्रकारची झटपट तयार होणारी ग्रेव्ही बनवून फ्रिजमध्ये स्टोअर (How To Make An All-In-One Gravy: Fit For All Kinds Of Indian Curries) करून ठेवू शकतो. जेणेकरून आयत्यावेळी आपली घाई गडबड होणार नाही. या ग्रेव्हीचा (All-purpose curry base gravy) वापर करून आपण झटपट ग्रेव्हीच्या भाज्या तयार करु शकतो. ही ग्रेव्ही कशी बनवून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावी याची सोपी रेसिपी पाहूयात(How to make all-purpose gravy base and store it properly).
साहित्य :-
१. तेल - ४ टेबलस्पून २. दालचिनी - १ इंचाचा लहान तुकडा ३. लवंग - ४ ते ५ काड्या४. काळीमिरी - ६ ते ७ दाणे ५. वेलची - ४ ते ५ ६. काळी मोठी वेलची - २ ७. कांदा - ६ ते ७ ( उभे चिरुन घेतलेले)८. लसूण पाकळ्या - १५ ते २० पाकळ्या ९. टोमॅटो - ५ ते ६ (लहान तुकडे करून घेतलेले)१०. काजू - ७ ते ८ (पाण्यांत भिजवून घेतलेले)११. काश्मिरी लाल मिरची - ५ ते ६ (पाण्यांत भिजवून घेतलेली)१२. धणेपूड - १ टेबलस्पून १३. गरम मसाला पावडर - १ टेबलस्पून १४. हळद - १ टेबलस्पून १५. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून १६. जिरेपूड - १ टेबलस्पून
ड्रायफ्रुट्सचे काप करणं किचकट काम, खूप वेळ लागतो ? २ सोप्या ट्रिक्स, झटपट करा भरपूर पातळ काप...
कृती :-
१. सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात दालचिनी, लवंग, काळीमिरी, वेलची, काळी मोठी वेलची असे सगळे खडे मसाले घालून घ्यावेत. २. हे सगळे खडे मसाले तेलांत चांगले भाजून घ्यावेत. ३. त्यानंतर यात चिरून घेतलेले कांदे, लसूण पाकळ्या, टोमॅटो, भिजवून घेतलेले काजू, काश्मिरी लाल मिरची घालावी. ४. हे सगळे जिन्नस तेलात परतून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.
गाजर न किसता अगदी १० मिनिटांत करा टेस्टी झटपट गाजर हलवा, जिभेवर ठेवताच अलगद विरघळेल असा स्वाद...
५. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली पेस्ट घालावी. ६. आता यात धणेपूड, गरम मसाला पावडर, हळद, लाल मिरची पावडर, जिरेपूड असे सगळे मसाले घालून घ्यावे. ७. त्यानंतर ही ग्रेव्ही मंद आचेवर शिजवून घ्यावी. ८. ग्रेव्ही शिजून थंड झाल्यावर आपण ती एका ट्रे मध्ये भरुन मग फ्रिजरमध्ये ठेवावी.
आपली मल्टिपर्पज भाज्यांची ग्रेव्ही तयार आहे. या एकाच ग्रेव्हीचा वापर करून आपण झटपट भाज्या बनवू शकतो. याचा वापर करण्यापूर्वी किमान १ तास आधी तरी हा ट्रे बाहेर काढून ठेवावा.