दिवाळीत फराळाला विशेष महत्व आणि मानाचे स्थान असते. दिवाळी फराळाच्या पदार्थांशिवाय अपूर्णच आहे. दिवाळी फराळात लाडू, करंजी, चकली, चिवडा, शेव असे अनेक पदार्थ तयार केले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या, चवीच्या शेव आपण खरंतर वर्षभर खातो, पण तरीही दिवाळीत घरी केलेली शेव म्हणजे खास. दिवाळीत अनेक प्रकारच्या शेव करणं आणि त्या मनसोक्त खाणं हा आनंदच काही वेगळा असतो. बारीक शेव, लसूण शेव, जाड शेव, नायलॉन शेव असे शेवेचे अनेक प्रकार आपण रोज खातोच(Home made Aloo Bhujia Festive Snacks).
बहुतेकवेळा सगळ्यांच्याच घरी दिवाळीनिमित्त मसाला शेव हा पारंपरिक कॉमन पदार्थ बनवला जातो. कुरकुरीत, खमंग शेव कोणालाही सहज जमण्यासारखी आहे. शेवेसाठी फारच कमी साहित्य लागत आणि शेव खूप पटकन तयार देखील होतात. पण नेहमीच्याच या पदार्थाला थोडासा ट्विस्ट देत आपण बाहेर विकत मिळणाऱ्या चटपटीत आलू भुजिया घरीच करु शकतो. आलू भुजिया (Aloo Bhujia Shev Recipe) हा देखील शेवेचाच एक नवीन प्रकार. कुरकुरीत, खमंग, मसालेदार आलू भुजिया अगदी चटकन बनून तयार होतात व तितक्याच पटकन फस्त देखील केल्या जातात. यंदाच्या दिवाळीत कुरकुरीत, झणझणीत आलू भुजिया तयार करण्याची घ्या सोपी रेसिपी(How To Make Aloo Bhujia At Home For Diwali).
साहित्य :-
१. बटाटे - ४ (उकडवून मॅश केलेले)
२. बेसन - २ कप
३. तांदुळाचे पीठ - १/२ कप
४. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
५. चाट मसाला - १ टेबलस्पून
६. हळद - १ टेबलस्पून
७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
८. धणेपूड - १ टेबलस्पून
९. गरम मसाला - १/२ टेबलस्पून
१०. जिरेपूड - १/२ (भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर)
११. मीठ - चवीनुसार
Diwali : कोकणात घरोघर करत तशी गोड ‘बोरं’ यंदा करुन तर पाहा, आजीच्या आठवणीतला पारंपरिक पदार्थ...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बटाटे उकडवून ते मॅश करून घ्यावेत.
२. आता एक चाळण घेऊन त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, आमचूर पावडर, चाट मसाला, हळद, लाल तिखट मसाला, धणेपूड, गरम मसाला, जिरेपूड असे सगळे जिन्नस घालावेत.
३. आता हे सगळे जिन्नस उकडवून मॅश केलेल्या बटाट्यात घालून ते सगळे एकजीव करुन घ्यावे.
Diwali : यंदा दिवाळीत करा रतलामी शेव, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी - फराळाची वाढेल लज्जत...
४. त्यानंतर या मिश्रणात तेल घालून पीठ मळून घ्यावे.
५. शेव गाळण्याच्या साच्याला आतून थोडेसे तेल लावून त्यात या तयार पिठाचा गोळा घालावा.
६. एका कढईत तेल गरम करुन त्यात या आलू भुजिया साच्याच्या मदतीने सोडून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात.
विकत सारख्या झटपट तयार होणाऱ्या आलू भुजिया खाण्यासाठी तयार आहे.