Join us  

ना बटाटे उकडण्याची गरज - ना सारणाची भानगड, फक्त १० मिनिटांत करा गरमागरम आलू पराठे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 3:51 PM

How to make Aloo Paratha without Stuffing : Aloo Paratha Recipe : आलू पराठा करणं हे वेळखाऊ काम आता होईल अगदी सोपं...

सगळ्यांच्याच 'ऑल टाईम फेव्हरेट' पदार्थांच्या यादीत पराठ्याचे नाव हे पहिले येते. 'पराठा' हा असा पदार्थ जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाणे पसंत करतो. पराठ्यांचे वेगवेगळे असे असंख्य प्रकार असतात. पराठ्यांचे असे कितीही प्रकार असले तरीही या सगळ्यांत 'आलू पराठा' हा सगळ्यांचाच आवडीचा प्रकार असतो. 'पराठा' हा एकमेव असा पदार्थ आहे की जो आपल्यात सगळं काही सामावून घेतो. पराठा वेगवेगळ्या भाज्या भरून तयार करण्यात येतो. त्यात आलू पराठा फार फेमस आहे. प्रत्येक घरात आलू पराठा हमखास केला जातो. आलू पराठा (How to prepare aloo parathas) करण्याची प्रत्येकाची पद्धत ही  वेगवेगळी असते(Easy Aloo Paratha Recipe).

आलू पराठा (Perfect Aloo Paratha Recipe with Tips & Tricks : Aloo Paratha Recipe) हा शक्यतो बटाटा उकडवून त्यात सगळे मसाले घालून त्याचे स्टँफिंग बनवून तयार केला जातो. त्याचबरोबर गव्हाच्या पिठात उकडलेला बटाटा कुस्करुन घालून देखील आलू पराठा बनवला जातो. काहीवेळा घाई गडबडीत आपल्याला बटाटे उकडवून घेण्यास किंवा त्याचे स्टफिंग (No stuffing aloo paratha recipe) तयार करण्यास तितकासा वेळ नसतो. अशावेळी आपण झटपट कच्च्या बटाटयाची एक सोपी ट्रिक वापरुन अगदी १० मिनिटांत तयार होणारे आलू पराठे बनवू शकतो. आलू पराठ्यासाठी बटाटे न उकडता, स्टफिंग न बनवता देखील आपण तितकाच चविष्ट व खमंग आलू पराठा बनवू शकतो. मास्टरशेफ पंकज भदौरिया कच्च्या बटाट्याचा (Aloo Paratha with Raw Potatoes) वापर करुन आलू पराठे कसे बनवायचे याची सोपी रेसीपी सांगत आहेत(How to make aloo paratha without boiling potatoes). 

साहित्य :- 

१. कच्चे बटाटे - ३ २. हिरव्या मिरच्या - ३ ३. आल्याचा तुकडा - १ इंचाचा आल्याचा तुकडा ४. कांदा - १ छोट्या आकाराचा कांदा (मध्यम आकाराचे तुकडे केलेला)५. गव्हाचे पीठ - २ कप ६. कसुरी मेथी - १ टेबलस्पून ७. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार ९. तेल - गरजेनुसार१०. साजूक तूप - १ टेबलस्पून ११. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)१२. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)१३. बटर - २ टेबलस्पून १४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 

मेथीची भाजी कडवट होते ? ९ गोष्टी - मेथीची भाजी होईल एकदम चमचमीत - कडू अजिबात लागणार नाही...

विकतच्या मेदूवड्याला असतो तसा गोल आकार जमत नाही ? २ झटपट ट्रिक्स, करा उडपीस्टाइल वडा...

कृती :- 

१. सगळ्यात आधी बटाटे सोलून त्याची साल काढून घ्यावीत. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात कच्च्या बटाट्याचे लहान तुकडे, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, छोटा कांदा घेऊन त्याची पातळ पेस्ट बनवून घ्यावी. २. आता एका मोठ्या डिशमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात ही तयार पेस्ट, कसुरी मेथी, चिली फ्लेक्स, लाल तिखट मसाला, मीठ, तेल घालून कणिक मळून घ्यावे.३. त्यानंतर या कणकेचे गोळे करुन घ्यावेत. आता एक एक गोळा घेऊन आलू पराठा लाटून घ्यावा. 

फ्रेंच फ्राईज परफेक्ट होण्यासाठी शेफ पंकज भदोरिया सांगतात ५ स्टेप्स, उपवासाला खा रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज...

झटपट डाळिंब सोलण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, डाळींब चटकन सोलून पटकन खा !

४. आलू पराठा लाटून झाल्यानंतर त्यावर सर्व बाजूने साजूक तूप लावून तो परत गोळा करुन त्याचा परत पराठा लाटून घ्यावा.५. आता पराठा लाटल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व थोडेसे सुके गव्हाचे पीठ भुरभुरवून घ्यावे.  ६. परत हलक्या हाताने पराठा अलगद लाटून घ्यावा, तव्याला थोडेसे तेल लावून हा पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा. ७. जर आपल्याला पराठा अधिक क्रिस्पी हवा असेल तर पराठ्यावर थोडेसे बटर लावून नंतर त्याला ग्रीलवर हलकेच खरपूस भाजून घ्यावे. 

गाजर न किसता अगदी १० मिनिटांत करा टेस्टी झटपट गाजर हलवा, जिभेवर ठेवताच अलगद विरघळेल असा स्वाद...

आपले आलू पराठे खाण्यासाठी तयार आहेत. हे आलू पराठे दही, सॉस, लोणचं यांसोबत खाण्यासाठी गरमागरम सर्व्ह करावेत.

टॅग्स :अन्नपाककृती