आपल्या भारताचं मुळात हेच वैशिष्ट्य आहे की इथे प्रत्येक गोष्टीत वैविध्यता आढळून येते. आपल्याकडे जशा वेगवेगळ्या चालीरिती, परंपरा आहेत तशाच प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळी खाद्यसंस्कृती आहे. त्यामुळे खवय्यांसाठी भारतासारखी दुसरी पर्वणी असूच शकत नाही. इथे प्रत्येक जिल्ह्यानुसारही खाद्य संस्कृतीत थोडा फार बदल दिसून येतो. आता हेच पाहा ना बटाट्याचे पराठे आणि मोमोज या दोन अतिप्रसिद्ध पदार्थांचं सुंदर कॉम्बिनेशन असणारा आलू पिठा हा पदार्थ बिहार आणि झारखंड या भागात सर्वत्र पाहायला मिळतो (how to make aloo pitha?). तिथला तो एक पारंपरिक पदार्थ असून चवीला अतिशय चटपटीत असतो (Traditional Bihari Food Aloo Pitha Recipe). विशेषत: हिवाळ्यात तिथे हा पदार्थ आवर्जून केला जातो. आता तुम्हीही आलू पराठे आणि मोमोजचे चाहते असाल तर आलू पिठा नेमका कसा असतो हे पाहायलाच हवे.. (simple and easy tips for making aloo pitha)
आलू पिठा रेसिपी
साहित्य
३ ते ४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
१ बारीक चिरलेला कांदा
३ ते ४ चमचे मटार दाणे
मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ गोड पदार्थ- घ्या सोप्या रेसिपी
दोन वाट्या तांदळाचे पीठ
फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, जिरे, कडिपत्ता, चिमूटभर हळद
३ ते ४ बारीक कुटलेल्या हिरव्या मिरच्या
१ टीस्पून आलं- लसूण पेस्ट
एका लिंबाचा रस
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
कृती
सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये पाणी टाकून ते थोडं गरम होऊ द्या.
गरम पाण्यात थोडं मीठ आणि तांदळाचं पीठ टाका आणि हलवून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि कढईवर झाकण ठेवून पीठ तसंच पाण्यात भिजू द्या.
मार्गशीर्ष गुरुवार: देवीच्या पूजेसाठी चटकन करा आकर्षक सजावट! पूजेचा उत्साह वाढून प्रसन्न वाटेल
तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यात तेल घालून फोडणी करून घ्या.
फोडणी झाल्यानंतर कांदा आणि मटार टाकून परतून घ्या. त्यानंतर आलं- लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट परतून घ्या. नंतर उकडलेले बटाटे मॅश करून टाका. बटाटे टाकल्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट घाला आणि लिंबू पिळा. आता कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
तोपर्यंत ज्या कढईमध्ये तांदळाचं पीठ भिजवलं होतं ते जर बऱ्यापैकी कोमट झालं असेल तर ते ही हाताने मळून घ्या.
खारीक पावडर करणं अवघड वाटतं? १ सोपी ट्रिक- थंडीतल्या लाडूसाठी १५ मिनिटांत करा किलोभर पावडर
आता तांदळाच्या पिठाचा छोटासा गोळा घ्या. तो हातानेच पसरवा. त्यामध्ये भाजीचं सारण भरा आणि पुन्हा तो बंद करा. असे बरेच गोळे तयार झाले की मग ढोकळा पात्र किंवा इडली पात्र घ्या आणि हे आलू पिठा साधारण १० ते १२ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या.
चटकदार पुदिना चटणीसोबत गरमागरम आलू पिठा खाऊन पाहा. एवढे चटकदार होतील की तुम्ही विकतचे मोमोज खाणं विसरून जाल.