Lokmat Sakhi >Food > ताज्या हिरव्यागार कैरीचे करा आंबटगोड वरण, नेहमीच्या वरणभाताची बदलेल चव-पाहा सोपी सुंदर रेसिपी

ताज्या हिरव्यागार कैरीचे करा आंबटगोड वरण, नेहमीच्या वरणभाताची बदलेल चव-पाहा सोपी सुंदर रेसिपी

How to make ambe dal : आंब्याची डाळ अगदी कमीत कमी साहित्यात तयार होईल. (Ambe Dal Recipe)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 11:54 AM2023-03-25T11:54:05+5:302023-03-25T17:28:33+5:30

How to make ambe dal : आंब्याची डाळ अगदी कमीत कमी साहित्यात तयार होईल. (Ambe Dal Recipe)

How to make ambe dal : Aamba dal recipe easy cooking hacks | ताज्या हिरव्यागार कैरीचे करा आंबटगोड वरण, नेहमीच्या वरणभाताची बदलेल चव-पाहा सोपी सुंदर रेसिपी

ताज्या हिरव्यागार कैरीचे करा आंबटगोड वरण, नेहमीच्या वरणभाताची बदलेल चव-पाहा सोपी सुंदर रेसिपी

उन्हाळ्यात बाजारात ताज्या कैऱ्या यायला सुरुवात झाली आहे.(How to make Ambe Dal) कैरीचं पन्हं, कैरीचं सरबत, आंब्याचं लोणचं, आंब्याची डाळ, कोय घालून वरण, रायते, मेथांबा असे अनेक पदार्थ घरोघर केले जातात. (Mango dal recipe easy cooking hacks) कैरीच्या या मौसमात कैरी घालून अनेक पदार्थ करता येतात. अगदी आपलं नेहमीचं तुरीचं वरणही कैरी घालून छान करता येतं. तशीच ही कैरीच्या वरणाची एक रेसिपी(Ambe Dal Recipe)
कैरीचं वरण अगदी नेहमीसारखं. तुरीच्या डाळीचं. मात्र भातासोबत, पोळीसोबत हे वरण उत्तम लागतं. तोंडाला चव येते. हे वरण दोन प्रकारे करता येतं एकतर तुरीची डाळ नेहमीप्रमाणे शिजवून फोडणीला घालायची. फक्त फोडणीत बारीक चिरलेली कैरी घालून, ती मऊ होईतो शिजू द्यायची. चिमूटभर मेथीही घालता येते. हिंग-मिरची किंवा तिखट घालून हे वरण उत्तम लागतं. अगदी असंच वरण करताना आपण त्यात कैरीची कोयही घालू शकतो. कढीपत्ता फोडणी दिलेलं हे आंबटगोड वरण चवीला फार छान लागतं.


 

या वरणासह तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरून आंबे डाळ ही करु शकता. ही डाळ चैत्रगौरीच्या हळदीकुंकाला केली जाते. सायंकाळचा खाऊ म्हणूनही ही आंबटगोड डाळ उत्तम लागते.

साहित्य

दीड कप कैरी, त्यासाठी थोडी आंबट कैरी घ्यावी.

पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ

फोडणीसाठी १ टीस्पून जीरे, १ टीस्पून मोहरी, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, २ हिरव्या मिरच्या

१) सगळ्यात आधी चण्याची डाळ दोन ते तीन तास भिजत ठेवा आणि कैरी किसून घ्या.

२) नंतर त्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात हरभऱ्याची डाळ २  हिरव्या मिरच्या, चवीपुरतं  मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. जास्त बारीकही वाटू नका.

३)  त्यानंतर वाटलेली डाळ आणि कैरी एकत्र करून कोथिंबीर घाला.  

४) फोडणीसाठी तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, जीरं, कढीपत्त्याची फोडणी घाला.  चविष्ट आंबेडाळ तयार आहे.

Web Title: How to make ambe dal : Aamba dal recipe easy cooking hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.