Lokmat Sakhi >Food > महागडी आवळा पावडर- चूर्ण कशाला विकत घेता? २० रुपयाचे आवळे आणून 'या' पद्धतीने घरीच करा

महागडी आवळा पावडर- चूर्ण कशाला विकत घेता? २० रुपयाचे आवळे आणून 'या' पद्धतीने घरीच करा

Amla Powder And Amla Churna Recipe: आवळा पावडर, आवळा चूर्ण विकत घ्यायला गेलं तर त्यासाठी बरेच पैसे लागतात. त्यापेक्षा ते घरीच कसं तयार करायचं ते पाहा..(simple recipe of making Gooseberry powder and Gooseberry churna)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 02:59 PM2024-11-12T14:59:28+5:302024-11-12T15:00:30+5:30

Amla Powder And Amla Churna Recipe: आवळा पावडर, आवळा चूर्ण विकत घ्यायला गेलं तर त्यासाठी बरेच पैसे लागतात. त्यापेक्षा ते घरीच कसं तयार करायचं ते पाहा..(simple recipe of making Gooseberry powder and Gooseberry churna)

how to make amla powder and amla churna at home, simple recipe of making Gooseberry powder and Gooseberry churna | महागडी आवळा पावडर- चूर्ण कशाला विकत घेता? २० रुपयाचे आवळे आणून 'या' पद्धतीने घरीच करा

महागडी आवळा पावडर- चूर्ण कशाला विकत घेता? २० रुपयाचे आवळे आणून 'या' पद्धतीने घरीच करा

Highlightsआवळा पावडर किंवा आवळा चूर्ण विकत आणायला गेलं तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ घरच्याघरीच अतिशय सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहा..

व्हिटॅमिन सी चा सर्वोत्तम स्त्रोत म्हणून आवळा ओळखला जातो. आवळा फक्त आरोग्यवर्धकच नाही तर सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीनेही अतिशय उपयोगी आहे. कारण केसांसाठी, त्वचेसाठी आवळा फायदेशीर ठरतो. म्हणूनच तर दररोज थोडा का होईना पण आवळा खायलाच पाहिजे. आता सध्या आवळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे मुरांबा, आवळ्याचं लोणचं, आवळा सुपारी, आवळा कॅण्डी हे पदार्थ तर आपण करतोच. पण त्यासोबतच आता आवळ्याचे चूर्ण आणि आवळा पावडर करून पाहा. कारण आवळ्याचे चूर्ण पचनशक्ती चांगली होण्यासाठी अतिशय उपयोगी ठरते. तर आवळा पावडर आपल्याला वेगवेगळ्या रेसिपींमध्ये किंवा केसांवर केल्या जाणाऱ्या घरगुती उपचारांसाठी वापरात येते. आवळा पावडर किंवा आवळा चूर्ण विकत आणायला गेलं तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात (how to make amla powder and amla churna at home?). त्यामुळे हे दोन्ही पदार्थ घरच्याघरीच अतिशय सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहा..(simple recipe of making Gooseberry powder and Gooseberry churna)

 

आवळा पावडर करण्याची रेसिपी

आवळा पावडर करण्यासाठी आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्या. ते पुर्णपणे कोरडे झाल्यानंतर त्याच्या बारीक फोडी करा.

यानंतर या फोडी मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करा. यावेळी त्यात अजिबात पाणी घालू नये.

९० टक्के महिला किचनमध्ये ४ ठिकाणी स्वच्छता करायला विसरतात! त्यामुळेच मुंग्या- झुरळं वाढतात

आता आवळ्याची पेस्ट एका स्वच्छ, सुती कपड्यावर किंवा गाळणीमध्ये टाका आणि त्यातलं सगळं पाणी पिळून गाळून घ्या. 

या पाण्यामध्ये मीठ, जिरेपूड, खडीसाखर, काळं मीठ, साधं मीठ हे पदार्थ टाकून तुम्ही त्याचं छान सरबतही करू शकता.

 

आता जो आवळ्याचा चोथा कपड्यात किंवा गाळणीत उरला आहे तो एका पसरट ताटात टाकून सावलीत वाळवून घ्या. पक्का वाळल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करा. ही झाली आवळा पावडर तयार.

जुना झाडू फेकू नका, बागेच्या सजावटीसाठी वापरा- बघा बागेचा लूक बदलणाऱ्या ३ सुंदर आयडिया

आवळ्याचं चूर्ण तयार करण्यासाठी वरील पद्धतीने तयार केलेल्या आवळा पावडरमध्ये थोडा गुळाचा पाक, मीठ, काळं मीठ, सुंठ, जिरेपूड टाका आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या. दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापुर्वी गरम पाण्यात चूर्ण टाकून प्या. पचनाशी संबंधित अनेक त्रास कमी होतील. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. 

 

Web Title: how to make amla powder and amla churna at home, simple recipe of making Gooseberry powder and Gooseberry churna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.