Lokmat Sakhi >Food > कडधान्यांची उसळ नेहमीचीच, आता त्याचे टम्म फुगणारे जाळीदार आप्पे करून पाहा, घ्या सोपी रेसिपी 

कडधान्यांची उसळ नेहमीचीच, आता त्याचे टम्म फुगणारे जाळीदार आप्पे करून पाहा, घ्या सोपी रेसिपी 

How To Make Appe From Legumes: तांदूळ न वापरता वेगवेगळी कडधान्ये घालून आप्पे कसे करायचे, याची ही एकदम सोपी रेसिपी पाहा. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे... (easy recipe of making appe from legumes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2024 03:56 PM2024-07-01T15:56:09+5:302024-07-01T15:57:43+5:30

How To Make Appe From Legumes: तांदूळ न वापरता वेगवेगळी कडधान्ये घालून आप्पे कसे करायचे, याची ही एकदम सोपी रेसिपी पाहा. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे... (easy recipe of making appe from legumes)

How to make appe from legumes, easy recipe of making appe from legumes, kaddhanyanche appe recipe in marathi | कडधान्यांची उसळ नेहमीचीच, आता त्याचे टम्म फुगणारे जाळीदार आप्पे करून पाहा, घ्या सोपी रेसिपी 

कडधान्यांची उसळ नेहमीचीच, आता त्याचे टम्म फुगणारे जाळीदार आप्पे करून पाहा, घ्या सोपी रेसिपी 

Highlightsमुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. शिवाय त्यातून भरपूर प्रोटीन्सही मिळतात.

मूग, मटकी, राजमा, हरबरे, मसूर ही सगळी कडधान्ये म्हणजे प्रोटीन्सचा सुपरडोस. त्यामुळेच तर आपण या धान्यांच्या उसळी नेहमीच करतो. पण बऱ्याचदा असं होतं की त्याच त्या उसळी खाऊन कंटाळा येतो. म्हणून मग उसळ खावी वाटत नाही म्हणून आपण ती कडधान्यंच काही वेळा खाणं टाळतो. म्हणूनच अशा वेळी ही एक खास रेसिपी करून पाहा (How to make appe from legumes?). यामध्ये आपण वेगवेगळी कडधान्ये घालून आणि तांदळाचाअजिबात वापर न करता आप्पे कसे करायचे ते पाहूया (kaddhanyanche appe recipe in marathi).. मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. शिवाय त्यातून भरपूर प्रोटीन्सही मिळतात. (easy recipe of making appe from legumes)

 

कडधान्यांचे आप्पे करण्याची रेसिपी

मूग, मटकी, राजमा, हरबरे अशी कडधान्ये सगळी मिळून १ वाटी

१ वाटी उडीद डाळ

स्वयंपाक खूपच उरला? अन्न वाया न घालवता करा ६ चमचमीत पदार्थ- बघता बघता होतील फस्त..

अर्धी वाटी रवा

३ ते ४ हिरव्या मिरच्या

२ टेबलस्पून कोथिंबीर

बघा सध्या सुपरहीट असणारा '2-2-2' वेटलॉस फॉर्म्युला- सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झटपट कमी करा...

१ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट

बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो मिळून एक वाटी

१ वाटी दही

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी कडधान्ये आणि उडीदाची डाळ एका भांड्यात काढून घ्या आणि दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ती ७ ते ८ तास भिजू द्या.

अबब चेन्नईत ५०० रुपयांना १ प्लेट इडली!! पाहा ब्लड- शुगर नियंत्रित ठेवणाऱ्या 'त्या' इडलीची खासियत...

भिजवलेली कडधान्ये आणि उडीद डाळ, हिरव्या मिरच्या, आलं- लसूण पेस्ट, कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पीठ करून घ्या.

आता या पिठामध्ये चिरलेला कांदा- टोमॅटो, किंवा तुमच्या आवडीच्या इतर भाज्या, दही, रवा, मीठ घाला आणि सगळं मिश्रण हलवून घ्या. पाणी टाकून आपण इतर वेळी आप्पे करण्यासाठी जसं पीठ कालवतो, तसं कालवून घ्या. ५ मिनिटे त्यावर झाकण ठेवून द्या. 

यानंतर आप्पे पात्राला तेल लावून नेहमीप्रमाणे आप्पे करा. 

 

Web Title: How to make appe from legumes, easy recipe of making appe from legumes, kaddhanyanche appe recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.