झुणका भाकर हा महाराष्ट्रीयन पारंपरिक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. झुणका हा पदार्थ गरमागरम भाकरी सोबतच खायला छान लागतो. झुणका हा दोन प्रकारे बनवता येतो. पातळ झुणका आणि मोकळा झुणका असे झुणक्याचे दोन प्रमुख प्रकार असतात. या दोन्ही प्रकारच्या झुणक्यांची चव अतिशय चांगली लागते. कधी आपल्याला रोजच्या त्याच त्याच भाजीचा कंटाळा आला किंवा काहीवेळा घरात आयत्यावेळी बनवायला भाजी नसली की आपण झटपट बेसनाचा वापर करुन झुणका तयार करु शकतो. झुणका किंवा पिठलं हे अगदी कमी साहित्यात कमी वेळेत झटपट बनून तयार होणारे पदार्थ आहेत.
झणझणीत असे म्हटल्यावर प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येत ते झुणका - भाकर. झुणका भाकर ही महाराष्ट्राची खास ओळख आहे. गरमागरम झुणका आणि भाकरी खाण्याचा आनंद काही निराळाच असतो. त्यातही झुणक्यात मध्येच लागणारा कांदा जेव्हा दाताखाली टचटचतो तेव्हा खाण्याला आणखीच मजा येते. झुणक्यातील बारीक कांद्याची पात दाताखाली आली की जो सुगंध तोंडातल्या तोंडात तयार होतो त्याला तोड नाही. अस्सल गावरान झुणका घरच्या घरी बनवण्याची सोपी झटपट कृती पाहूयात(How To Make Maharashtrian Zunka Recipe : Homemade Recipe).
साहित्य :-
१. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
२. जिरे - १ टेबलस्पून
३. मोहोरी - १ टेबलस्पून
४. हिंग - चिमूटभर
५. लसूण पाकळ्या - ४ ते ५ (बारीक चिरुन घेतलेल्या)
६. कांदा - १ कप (बारीक चिरुन घेतलेला)
७. कांद्याची पात - १/२ कप (बारीक चिरुन घेतलेली)
८. बेसन - १ कप
९. पाणी - अर्धा कप
१०. कोथिंबीर - १ टेबलस्पून
११. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
उन्हाळ्यात बाटलीतील पाणी जास्त वेळ थंड ठेवण्यासाठी १ सोपी ट्रिक... पाणी राहील गारेगार...
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहोरी, चिमूटभर हिंग, बारीक चिरलेला लसूण घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी.
२. आता या फोडणीत बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात, लाल तिखट मसाला घालून घ्यावा.
३. त्यानंतर त्यात बेसन पीठ घालावे, बेसन घातल्यानंतर ते २ ते ३ मिनिटे चांगले भाजून फोडणीमध्ये एकजीव करुन घ्यावे.
४. आता हाताच्या ओंजळीत थोडे थोडे पाणी घेऊन ते या झुणक्यामध्ये सोडावे.
५. मग झुणक्याचे छोटे छोटे गोल गठ्ठे होईपर्यंत झुणका शिजवून घ्यावा.
थालीपीठ करायचं पण भाजणीचं पीठच नाही? झटपट करा मिक्स पिठांचे खमंग मेथी थालीपीठ, पौष्टिक आणि पोटभर...
सगळ्यात शेवटी झुणक्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून हा गरमागरम झुकणा भाकरी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.