Join us  

बाजरीची भाकरी करतोच आता करा बाजरीचा खरपूस पराठा, मुलांनाही आवडेल आणि पौष्टिकही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 12:09 PM

Delicious And Healthy Bajari Paratha Recipe: बाजरीची भाकरी अनेक जणांना आवडत नाही. म्हणूनच बाजरीचा पराठा करण्याची ही सोपी रेसिपी एकदा बघाच...

ठळक मुद्देबाजरीची भाकरी आवडत नसेल तर बाजरीचा पराठा करा. मुलांना डब्यात देण्यासाठीही हा एक चांगला पदार्थ आहे.

रोज- रोज गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही, असं डॉक्टरही नेहमीच सांगतात. म्हणूनच तर मग आपण कधी ज्वारी- बाजरी यांच्या भाकरी खातो. पण काही घरात मोठ्या माणसांनाही बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी आवडत नाहीत. त्यामुळे मग बाजरी आणि ज्वारी यांचा आहारात समावेश होत नाही आणि त्यांच्यातील पोषण मूल्ये शरीराला मिळत नाहीत. म्हणूनच मग बाजरीची भाकरी आवडत नसेल तर बाजरीचा पराठा करा (How to make Bajara paratha?). मुलं देखील आवडीने खातील. मुलांना डब्यात देण्यासाठीही हा एक चांगला पदार्थ आहे. (Healthy food for tiffin )

 

बाजरीचा पराठा करण्याची रेसिपीही रेसिपी इंस्टाग्रामच्या healthy___bites या पेजवर शेअर करण्यात आली आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. या रेसिपीनुसार आपण आता बाजरी- मेथी पराठा कसा करायचा ते बघणार आहोत. पण मेथी ऐवजी कोबी, फ्लाॅवर, पालक अशा वेगवेगळ्या भाज्या टाकूनही तुम्ही पराठा करू शकता. 

कलर केलेल्या केसांचा रंग टिकेल खूप दिवस, लावा जास्वंदाच्या फुलांचं खास कंडिशनर, केस चमकतीलबाजरी- मेथी पराठा करण्याची रेसिपीसाहित्यएक कप बाजरीचे पीठ 

एक गव्हाचे पीठ 

दोन वाट्या चिरलेली मेथी किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या 

 

एक वाटी दही

एक टीस्पून आलं- लसूण पेस्ट

सारा खान ते माधुरी दिक्षित- सेलिब्रिटींनी साजरे केले रक्षाबंधन, मायेनं जपलं हक्काचंं नातं

१ हिरवी मिरची बारीक चिरलेली

१ टेबलस्पून तीळ 

चवीनुसार मीठ आणि पराठ्याला लावण्यासाठी तेल किंवा तूप

 

रेसिपी१. सगळ्यात आधी बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, भाज्या, दही आणि इतर सगळं साहित्य एका भांड्यात एकत्र करा.

शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी फक्त रोज चालणे पुरेसे नाही, करा ३ व्यायाम, वाचा भाग्यश्रीचा सल्ला

२. सगळं मिश्रण एकत्र करून गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्या.

३. पीठ मळून झालं की १० ते १५ मिनिटे झाकुन ठेवा. त्यानंतर त्याचा एक छोटा गोळा घ्या आणि त्याचा पराठा लाटा. पराठ्याच्या वरच्या बाजुवर तीळ टाका आणि पुन्हा एकदा पराठ्यावरून लाटणे फिरवा. तीळ पराठ्याला छान लागले जातील. आता हा लाटलेला पराठा तेल किंवा तूप लावून तव्यावर खमंग खरपूस भाजून घ्या.लोणचं, दही, सॉस, चटणीसोबत पराठा चवदार लागतो.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.