थंडीत ज्वारी, बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते. बाजरीची भाकरी चवीला (Bajrichi Bhakri Kashi kartat) उत्तम लागते तसंच पौषक तत्वांनी परिपूर्ण असते. (Bajri Roti Recipe) बाजरीची भाकरी तुम्ही जेवणात कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता किंवा या भाकरीला तूप लावूनही खाऊ शकता. (Winter Special Foods) बाजरीची भाकरी खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. बाजरीची भाकरी प्रत्येकालाच करता येते असं नाही. भाकरी कधी थापताना तुटते तर कधी जास्त जाड थापली जाते. म्हणूनच बाजरीची भाकरी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make Bajra Roti)
बाजरीची भाकरी कशी करायची? (Bajrichi Bhakri Making Tips)
1) बाजरीची भाकरी करण्यासाठी १ कप बाजरीचे पीठ घ्या. पीठ ताजं दळलेलं असावं तर पीठ एक ते दोन आठवड्यांपूर्वीचं असेल तर त्याची चव व्यवस्थित येणार नाही. जुन्या पीठाची चव कडवट लागते.
2) पीठात हळूहळू पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या. पीठ मळण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करून शकता जेणेकरून भाकरी तुटणार नाही.
रात्री पोटभर भात खाल्ला तरी पोट सुटणार नाही, भातासोबत खा ‘हा’ पदार्थ, पारंपरिक सोपा उपाय
3) मध्यम आकाराचे गोळे तोडून घ्या. तुम्ही ही भाकरी थापून करू शकता किंवा लाटूनही करू शकता. तुम्हाला हलक्या हाताने या भाकरीचे गोळे हाताने चपटे करून घ्यावे लागतील.
4) भाकरीच्या चपट्या गोळ्याला चपातीचं पीठ लावून तुम्ही चपातीप्रमाणे बाजरीची भाकरी लाटू शकता किंवा बाजरीचे पीठ लावून गोलाकार थापू शकता. भाकरी थापताना गरजेपेक्षा जास्त पीठ घालू नका अन्यथा भाकरी कडक होते.
गुडघे ठणकतात-हाडं खिळखिळी झाली? व्हिटामीन B-12 देणारे ८ व्हेज पदार्थ नियमित खा; फिट राहाल
5) तवा गरम करून भाकरी दोन्ही बाजूंनी लाल डाग येईपर्यंत भाजून घ्या. दोनदा फिरवल्यानंतर तिसऱ्यांदा तुम्ही ही चपाती थेट गॅसवर शेकू शकता.
बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे (Benefits of Eating Bajra Roti)
डायबिटीक रुग्णांसाठी बाजरीची भाकरी फायदेशीर ठरते. तर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भाकरीचा आहारात समावेश करू शकता. कारण नाश्त्याला किंवा जेवणाला ही भाकरी खाल्ली की बराचवेळ भूक लागत नाही. यात कमीत कमी कॅलरीज असतात. याच्या सेवनाने पोटदुखी आणि पचनाचे विकार टळतात. शरीरात बॅड कोलेस्टरॉल तयार होत नाही. रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि व्हायरल संक्रमणापासूनही बचाव होतो.