भारतात ९० टक्के लोक मधुमेहाच्या आजारापासून ग्रस्त आहेत. (Bajra Soup Recipe) प्रत्येक दोन घर सोडली तर मधुमेहाचा एकतरी रुग्ण आपल्याला आढळतो. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, वाढता ताण आणि वेळेवर झोप न घेणे यामुळे मधुमेहासारखा आजार आपल्याला जडतो.
हल्ली या आजाराने तरुणपिढीला देखील सतावले आहे. (Bajra for diabetes patients) कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी रक्तातील साखर वाढते की, काय? हा प्रश्न त्यांना सतावत असतो. हिवाळ्यात आपल्याला भूक अधिक प्रमाणात लागते. सतत काही तरी चटपटीत खावेसे किंवा प्यावेसे वाटते. (bajra soup control sugar level) परंतु अशावेळी आपल्याला काय खावे हे सुचत नाही. पण आम्ही तुम्हाला एक वेगळे असे सुप सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे पोटही भरेल आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहिल. आतापर्यंत तुम्ही बाजरीची भाकरी, खारोड्या, खिचडी, लाह्या, अप्पे किंवा इडली खाल्लीच असेल. (bajra soup for winters) पण आज आम्ही तुम्हाला सगळ्यात हेल्दी आणि प्रोटिन असलेले बाजरीच्या सूपची रेसिपी सांगणार आहोत. ही सोपी रेसिपी लगेच ट्राय करुन पाहा.
साहित्य
- बाजरीचे पीठ - ३ चमचे
- तेल - २ चमचे
- बारीक चिरलेले गाजर - १/४ वाटी
- बारीक चिरलेले बिन्स - १/४ वाटी
- बारीक चिरलेला पालक - १/४ वाटी
- बारीक चिरलेला टोमॅटो - १/४ वाटी
- मीठ - चवीनुसार
- काळीमिरी - चवीनुसार
- आलं लसणाची पेस्ट
- जिरे - १ चमचा
- पाणी - २ कप
- पनीरचे तुकडे - १ कप
- चिली फ्लेक्स - चवीनुसार
- कोथिंबीर