'आई भूक लागली' या मुलांच्या प्रश्नावर नेहमी काय उत्तर द्यावं, असा प्रश्न प्रत्येक आईला पडतोच. शाळेत मुलांच्या डब्यांत पोळी - भाजी तर देतोच पण सोबत खाऊच्या डब्यांत पौष्टिक पण हेल्दी रोज (How To Make Irani Bakery Style Mawa Cake At Home) काय द्यावं हा मोठा प्रश्न असतो. खरंतर, मुलांना चिप्स, केक, पेस्ट्री असे वेगवेगळे चटपटीत, गोड पदार्थ खायला खूपच आवडतात. परंतु नेहमीच असे विकतचे वेफर्स, केक किंवा इतर पदार्थ (How To Make Bakery Style Mawa Cake In Pressure Cooker) देणे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. अशावेळी आपण घरच्या घरीच झटपट घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात पटकन होणारा इराणी स्टाईल मावा केक तयार करु शकतो(Irani Bakery Style Mawa Cake).
हा केक तयार करण्यासाठी आपल्याला विशेषतः ओव्हन किंवा मायक्रोव्हेव्हची गरज लागत नाही. आपण कुकरमध्ये देखील विकतसारखा बेकरी स्टाईल इराणी मावा केक तयार करु शकतो. हा घरगुती कुकरमध्ये तयार केलेला मावा केक आपण मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी किंवा त्यांना भूक लागेल तेव्हा खायला देऊ शकतो. यासाठीच घरच्या घरीच कुकरमध्ये तयार होणारा विकतसारखा मावा केक कसा तयार करायचा त्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. बारीक रवा - १ कप २. साखर - १/२ कप ३. वेलची - १/२ टेबलस्पून४. तेल - १/४ कप ५. दूध - १/२ कप ६. दही - १/२ कप ७. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून ८. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून ९. ड्रायफ्रुटसचे काप - २ ते ३ टेबलस्पून १०. मैदा - १/२ टेबलस्पून
आता फक्त हिवाळ्यांतच नाही तर वर्षभर घ्या आवळ्याचा आस्वाद! आवळा स्टोअर करण्याची भन्नाट ट्रिक...
साचवून ठेवलेल्या तुपाला काही दिवसांनी कुबट वास येतो? तुपात २ पदार्थ मिसळा, तूप छान राहील...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका मिक्सरच्या भांड्यात बारीक रवा, साखर, वेलची घेऊन मिक्सरला बारीक करून घ्या.२. त्यानंतर या बारीक करून घेतलेल्या पिठात तेल, दूध, दही घालून मिक्सरला हे मिश्रण पुन्हा एकदा फिरवून त्याचे बॅटर तयार करून घ्यावे. ३. मिक्सरमध्ये वाटून तयार झालेले केकचे तयार बॅटर एका भांड्यात काढून ५ मिनिटांसाठी झाकून ठेवा.४. नंतर त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर व चमचाभर दूध घालून फेटून घ्या.५. केक टिनला आतून तेल लावून सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या.
६. त्यानंतर टिनमध्ये थोडासा मैदा भुरभुरवून मग केकचे तयार बॅटर ओतून घ्या.७. वरून ड्रायफ्रुट्स टाका.८. त्यानंतर हा केक टिन कुकरमध्ये ठेवून ४० ते ४५ मिनिटे मंद आचेवर केक बेक करून घ्यावा. (केक बेक करताना कुकरची शिट्टी काढणे).९. ४० ते ४५ मिनिटांनंतर केक थंड झाल्यावर सुरीच्या मदतीने केक टिन मधून काढून घ्यावा.
आपला परफेक्ट बेकरी स्टाईल इराणी मावा केक खाण्यासाठी तयार आहे. हा केक आपण मुलांची मधल्या वेळची छोटी भूक किंवा खाऊच्या डब्यासाठी देऊ शकता.