Join us  

हलवायासारखी खुसखुशीत बालूशाही घरीच करा; फक्त ३ वस्तूंनी बनेल परफेक्ट-रसरशीत बालूशाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:57 AM

Easy Steps to Making Balu shahi at Home (BaluShahi Kashi Karaychi) : हा पदार्थ घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. बालूशाही करण्याची सोपी रेसिपी पाहूया.

सण उत्सवांच्या वेळेस घरांत नेहमीच गोड धोड पदार्थ बनवले जातात. (Easy Steps to Making Balu Shahi at Home) नेहमी नेहमी तेच तेच खाण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी  सोप्या पद्धतीने हलवाई स्टाईल बालूशाही बनवू शकता.(How to Make Perfect Balushahi Recipe) बालूशाही बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. हा पदार्थ घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. बालूशाही करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Balu Shahi at Home)

१) बालुशाही बनवण्यासाठी ३०० ग्राम मैदा घ्या. त्यात १ चमचा बेकींग सोडा घाला. त्यात चिमूटभर मीठ घाला. हे दोन पदार्थ घालून हाताने मैद्यात मिसळून घ्या. त्यात अर्धा कप तूप घालून एकजीव करून घ्या. थोडं थोडं पाणी घालून हाताने व्यवस्थित मिळून घ्या.  जास्त दाबून पीठ मळू नका अन्यथा बालूशाही खुसखुशीत होणार नाही. थोड्यावेळासाठी पीठ झाकून ठेवा. 

२) बालुशाही बनवण्यासाठी एका कढईत ५०० ग्राम साखर घाला, साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता.  पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्या. एक तारी पाक तयार होईपर्यंत साखर ढवळत राहा. साखरेत वेलची घालून ढवळून घ्या. एका लहान वाटीत केसर १ वाटी पाण्यात मिसळून घ्या. हे पाणी साखरेच्या पाकात घाला.  पाक एक तारी झाल्यानंतर गॅस बंद करून पाक थंड करून घ्या. 

३) मैद्याचे पीठ पुन्हा हाताने मळून घ्या. हाताने थोडे थोडे पीठ घेऊन  गोळे तयार करून घ्या. हा थोडा थोडा चपटा करून त्यात पेन्सिल किंवा लांब आकाराचे साहित्य घालून मध्ये छिद्र पाडून घ्या.  

१ वाटी डाळ-तांदूळाचा करा विकतसारखा जाळीदार ढोकळा; जीभेवर ठेवताच विरघळेल-सोपी रेसिपी

४) कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बालुशाही मंद आचेवर फ्राय करून घ्या. बालुशाही लालसर गोल्डन झाल्यानंतर बालुशाही काढून घ्या. बालूशाही थोडी थंड करून ही साखरेच्या पाकात घाला. पाकात भिजवल्यानंतर बालूशाही एका ताटात काढून घ्या.  त्यावर पिस्त्याचे काप घालून बालुशाही सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स