Join us  

वरण-भाताबरोबर खायला पटकन करा खमंग बटाटा फ्राय; सोपी रेसिपी, साध्या जेवणाची वाढेल चव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 1:50 PM

How to make batata fry : घरच्याघरी अगदी कमी वेळात तुम्ही बटाटा फ्राय बनवू शकता.

रोजच्या जेवणाला काय  नवीन करावं असा प्रश्न नेहमी पडतो. नेहमी नेहमी तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. घरी काही बनवायचं म्हटलं की खूप वेळ लागतो म्हणून लोक घरी काही बनवण्यासाठी टाळाटाळ करतात.  (Batatyachya Kachrya) घरच्याघरी अगदी कमी वेळात तुम्ही बटाटा फ्राय बनवू शकता. (How to make potato fry at home)  बटाटा फ्राय म्हणजेच खमंग, कुरकुरीत बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याचे काप चवीला उत्तम लागतात. बटाट्याचे  काप बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (How to make batata fry)

साहित्य

१) बटाटा- १ ते २

२) रवा- १ ते २ वाटी

३) हळद- १ चमचा

४) लाल तिखट- १ चमचा

५) मीठ- चवीनुसार

६) तेल - गरजेपुरता

कृती

१) सगळ्यात आधी एक मोठा बटाटा साल काढून व्यवस्थित धुवून घ्या. या बटाट्याचे पातळ काप करा. त्यावर हळद, मीठ, लाल तिखट घालून व्यवस्थित एकजीव करा. एका ताटात रवा, लाल तिखट, हळद, मीठ घालून हे मिश्रण एकजीव करा.

२) त्यात बटाट्याचे काप घालून दोन्ही बाजूंनी रव्यात घोळवून घ्या. तव्यात तेल घालून व्यवस्थित दोन्ही बाजूंनी बटाट्याच्या चकत्या फ्राय करून घ्या. तयार आहे गरमागरम बटाटा फ्राय.

बटाटा फ्राय परफेक्ट बनवण्याच्या टिप्स

१) नेहमी अशा बटाट्यांचा वापर  करा जे कोल्ड स्टोरेज असतील. कारण ते लवकर शिजत नाहीत किंवा करपत नाहीत.

तांदुळाच्या पिठीत मिसळा १ गोष्ट, एकही मोदक फुटणार नाही सुबक-कळीदार मोदकांची खास पद्धत

२) बटाट्यातील अतिरिक्त स्टार्च काढून टाकण्यासाठी बटाटा नेहमी चिरून पाण्यात घालून ठेवा. तव्यात घालण्यापूर्वी  व्यवस्थित धुवून घ्या. 

३) पाण्यात ठेवल्याने बटाटे हायड्रेट राहतात आणि लवकर शिजतात.

चमचमीत भरली भेंडी 'या' नव्या पद्धतीने करा; भेंडी चिकट होणार नाही-आवडीने खातील सगळे

४) बटाटा फ्राय बनवण्यासाठी तुम्ही गरम मसाला, पावभाजी मसाला, किचन किंग मसाला किंवा सांभार पावडरचा वापर करू शकता.  

५) बटाटे व्यवस्थित शिजल्यानंतरच त्यात मीठ घाला. मीठ आधी घातल्याने बटाटे व्यवस्थित शिजत नाही.  दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी तसंच मुलांना डब्यात देण्यासाठी हा पदार्थ झटपट तयार होईल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न