Lokmat Sakhi >Food > पोहे नेहमी गचके तर कधी कडक होतात? 'ही' पद्धत वापरून करा परफेक्ट, मोकळे बटाटे पोहे

पोहे नेहमी गचके तर कधी कडक होतात? 'ही' पद्धत वापरून करा परफेक्ट, मोकळे बटाटे पोहे

How to make Batata Poha :

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:58 PM2023-01-17T15:58:43+5:302023-01-17T16:23:28+5:30

How to make Batata Poha :

How to make batata poha : Quick and easy batata pohe recipe | पोहे नेहमी गचके तर कधी कडक होतात? 'ही' पद्धत वापरून करा परफेक्ट, मोकळे बटाटे पोहे

पोहे नेहमी गचके तर कधी कडक होतात? 'ही' पद्धत वापरून करा परफेक्ट, मोकळे बटाटे पोहे

आपल्यापैकी बरेचजण रोज सकाळच्या नाश्त्याला पोहे खातात. कांदे पोहे, बटाटे पोहे अनेकांनाचा आवडता नाश्ता. पण कधी पोहे कडक होतात तर कधी खूपच गचगचीत. परफेक्ट पोहे बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही. परफेक्ट पोहे बनवण्याची ट्रिक या लेखात पाहूया. (How to make Perfect Pohe) पोट खाल्ल्यानंतर बराचवेळ भूक लागत नाही. पोट भरल्यासारखं वाटतं. त्यात फायबर्स असतात आणि लो फॅट असल्यामुळे पोहे तब्येतीलाही चांगले असतात. 

साहित्य

तेल 2-3 चमचे

जिरे 1/2 टीस्पून

मोहरी 1/2 टीस्पून

हिरवी मिरची 2 नग. (चिरलेली)

कढीपत्ता 10 ते12 

मीठ - चवीनुसार

शेंगदाणे 2 टीस्पून

बटाटे - 2 जाड चिरलेला

कांदा - 1  बारीक चिरलेला.

जाड पोहे- 3 कप

कृती

१) सगळ्यात आधी ३ कप जाडे पोहे घेऊन भिजवा. त्यानंतर गाळून घ्या आणि १० मिनिटांसाठी तसंच राहूद्या.

२) एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता, शेंगदाणे घालून परतून घ्या. 

३) शेंगदाणे  तळून झाल्यानंतर त्यात दोन बटाट्यांचे काप घाला. बटाट्याचे काप शिजल्यानंतर त्यात कांदा आणि साखर घालून परतून घ्या. त्यात अर्धा टिस्पून हळद घाला. बटाटे शिजल्यानंतर त्यात बाजूला ठेवलेले पोहे आणि कोथिंबीर घाला. 

४) झाकण ठेवून पोह्यांची एक वाफ काढून घ्या. या पद्धतीनं पोहे बनवल्यास ते अधिक रुचकर लागतील. 

Web Title: How to make batata poha : Quick and easy batata pohe recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.