Lokmat Sakhi >Food > डाळ-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा खमंग, कुरकुरीत बटाट्याचे काप; ही घ्या सोपी रेसेपी

डाळ-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा खमंग, कुरकुरीत बटाट्याचे काप; ही घ्या सोपी रेसेपी

How to make Batatyache Kap : दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला  किंवा डब्यालासुद्धा हा चांगला ऑपश्न आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 12:28 PM2022-12-18T12:28:31+5:302022-12-18T12:32:24+5:30

How to make Batatyache Kap : दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला  किंवा डब्यालासुद्धा हा चांगला ऑपश्न आहे.

How to make Batatyache Kap : Easy recipe of potato crispy batatyache kap or batatyachya kachrya | डाळ-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा खमंग, कुरकुरीत बटाट्याचे काप; ही घ्या सोपी रेसेपी

डाळ-भाताबरोबर खायला ५ मिनिटात करा खमंग, कुरकुरीत बटाट्याचे काप; ही घ्या सोपी रेसेपी

चपाती, भाजी डाळ भाताचं रोज तेचतेच जेवण खायला कंटाळा येतो. काहीतरी नवीन खावंस प्रत्येकालाच वाटत असतं. डाळभाताच्या जेवणाची रंग वाढवण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या काचऱ्या ट्राय करू शकता. जेवणात बटाटा रोज वापणारे लोक आवडीनं हा पदार्थ करतात. (Cooking Tips & Hacks)  खायला चविष्ट करायला अगदी सोपा असा हा पदार्थ तुम्ही कमीत कमी वेळात बनवू शकता. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला  किंवा डब्यालासुद्धा हा चांगला ऑपश्न आहे. (How to make Batatyache Kap)

साहित्य

३ ते ४ बटाटे

१/४ कप तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर

१ चमचा लाल तिखट

चिमूटभर हळद पावडर

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

कृती

एका भांड्यात तांदळाचे पीठ, तिखट, हळद आणि मीठ एकत्र करा. एका मोठ्या भांड्यात 3 कप पाणी घाला. बटाटे सोलून त्याचे पातळ काप करा. बटाट्याचे तुकडे करताच ते पाण्यात टाका. सर्व बटाटे कापून झाल्यावर तवा गरम करा. थोडे तेल घालून संपूर्ण पृष्ठभागावर पसरवा. 

गॅस कमी-मध्यम आचेवर ठेवा. बटाट्याचे काही तुकडे पाण्यातून काढा. किचन टॉवेल वापरुन, बटाट्याचे तुकडे थोडे कोरडे करा. थोडासा ओलावा राहूद्या जेणेकरून तांदळाचे पीठ स्लाइसच्या पृष्ठभागावर चिकटेल. कापलेल्या तांदळाच्या पिठात काप ठेवा.

बटाट्याच्या तुकड्यांच्या दोन्ही बाजूनं तांदळाच्या पिठाने घोळवून घ्या. बटाट्याचे तुकडे तव्यावर ठेवा आणि तपकिरी होईपर्यंत तळा. नंतर बटाट्याचे काप उलटा.

आवश्यक असल्यास पॅनमध्ये तेलाचे काही थेंब टाका. कुरकुरीत तळून झाल्यानंतर हे काप बाहेर काढून घ्या. तयार आहेत गरमागरम बटाट्याचे काप. हे काप तुम्ही वरण भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. 

Web Title: How to make Batatyache Kap : Easy recipe of potato crispy batatyache kap or batatyachya kachrya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.