Lokmat Sakhi >Food > ना गॅस - ना तेल, लालचुटूक बीटाची करा झणझणीत चटणी; वाढेल हिमोग्लोबिन - खा पोटभर

ना गॅस - ना तेल, लालचुटूक बीटाची करा झणझणीत चटणी; वाढेल हिमोग्लोबिन - खा पोटभर

How to make beetroot chutney indian style : ५ मिनिटात हिमोग्लोबिन वाढवणारी चटणी एकदा करून पाहाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 04:57 PM2024-09-20T16:57:02+5:302024-09-20T16:58:19+5:30

How to make beetroot chutney indian style : ५ मिनिटात हिमोग्लोबिन वाढवणारी चटणी एकदा करून पाहाच

How to make beetroot chutney indian style | ना गॅस - ना तेल, लालचुटूक बीटाची करा झणझणीत चटणी; वाढेल हिमोग्लोबिन - खा पोटभर

ना गॅस - ना तेल, लालचुटूक बीटाची करा झणझणीत चटणी; वाढेल हिमोग्लोबिन - खा पोटभर

लालचुटूक बीटरूट (Beetroot) खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Chutney). बीटरूटमध्ये प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी यासह इतर पौष्टीक घटक असतात (Cooking Tips). बीटरूट खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हिमोग्लोबिनची कमतरता दूर करणे, पचनक्रिया सुरळीत करणे. यासह स्टॅमिना वाढवण्याचं काम बीटरूट करते. पण बीटरूट खाताना बरेच जण नाकं मुरडतात.

जर लहान मुल बीटरूट खाताना नखरे करत असेल तर, त्यांना बीटाची चटणी खायला द्या. बीटरूट चटणी फक्त आरोग्यासाठी फायदेशीर नसून; यामुळे जेवणाची चवही वाढते. जर आपल्याला मेहनत न घेता बीटरूटची चटणी करायची असेल तर ही रेसिपी फॉलो करा(How to make beetroot chutney indian style).

बीटरूट चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य


बीटरूट

लसूण

हिरवी मिरची

कडीपत्ता

काळाकुट्ट झालेला फॅन साफ करण्यासाठी शिडीची गरजच नाही; १० मिनिटात पंखा करा चकचकीत

जिरं

कोथिंबीर

मीठ

लिंबाचा रस

कृती

सर्वात आधी बीटरूटचे साल काढून, त्याची तुकडे करा. तुकडे केलेले बीटरूट मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात पुदिना, ६ - ७ लसणाच्या पाकळ्या, ३- ४ हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, जिरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालून मिक्सर फिरवून घ्या.

डोक्यात सतत नकारत्मक विचारांचं काहूर? ५ गोष्टी करा; जगण्याला येईल आनंदी स्पीड

अशा प्रकारे बीटाची झणझणीत चटणी खाण्यासाठी रेडी. आपणही चटणी, चपाती, डोसा, किंवा कोणत्याही पराठ्यासोबत खाऊ शकता. लहान मुलांना टिफिनमध्येही आपण ही पौष्टीक चटणी खायला देऊ शकता.

Web Title: How to make beetroot chutney indian style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.