नाश्त्याला तुम्ही सकाळच्यावेळी पटकन होणारे पदार्थ करण्याच्या विचारात असाल तर खमन ढोकळा करू शकता. ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला आंबवण्याची, दळण्याची कोणीही क्रिया करावी लागणार नाही. (Khaman Dhokla Recipe in Marathi) एक ते दोन कप बेसनाचा वापर करून तुम्ही पटकन ढोकळा करू शकता. बेसनाचा ढोकळा १० ते १५ मिनिटांत बनून तयार होईल. (Khaman Dhokla Recipe) बाजारातील इंस्टंट ढोकळ्याचे पॅकेट्स आणण्यापेक्षा घरच्याघरी फ्रेश ढोकळा करता येईल ते ही अगदी कमीत कमी साहित्यात.
ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य (Besan Dhokla Recipe)
1) बेसन - २ कप
२) सिट्रिक एसिड- १.५ टिस्पून
३) साखर- ४ साखर
४) मीठ- अर्धा चमचा
५) हिंग- पाव चमचा
६) हळद- १ चमचा
७) किसलेलं आलं- अर्धा चमचा
८) बारीक केलेल्या मिरच्या- पाव चमचा
९) तेल - १ टिस्पून
१०) पाणी- २ कप
खमन ढोकळा घरी कसा करायचा? (Khaman Dhokla Making Tips at Home)
१) खमन ढोकळा करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये २ कप बेसन काढून घ्या. दुसऱ्या वाडग्यात सिट्रिक एसिड,साखर, मीठ, हिंग आणि पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट बेसन पीठात घाला. त्यात ग्लासभर पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात गरजेनुसार अजून पाणी घालून मिश्रण मध्यम कंसिटंन्सीचे होईपर्यंत पातळ करून घ्या.
२) त्यात हळद, मिरची, आलं घालून पुन्हा एकजीव करून घ्या. ढोकळ्याचे पीठ ज्या भांड्यात घालणार आहात त्या भांड्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्या.
रात्रीच्या जेवणासाठी करा मऊ-पौष्टीक ज्वारीची खिचडी; पचायला हलकी-एकदम सोपी मिलेट्स खिचडी
३) बेसनाच्या मिश्रणात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि पाणी घालून पुन्हा एकजीव करून घ्या. नंतर ढोकळ्याचे पीठ तेल लावलेल्या भांड्यात घाला आणि १० ते १५ मिनिटांसाठी ढोकळा वाफवून घ्या. ढोकळा वाफवण्यासाठी तुम्ही कढईत खाली पाणी ठेवू शकता किंवा कुकरमध्येही वाफवून घेऊ शकता.
४) फोडणीसाठी एका कढईत किंवा फोडणी पात्रात तेल गरम करून घ्या. त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता आणि मिरची, हिंग घालून फोडणी तयार करा. यात तुम्ही आवडीनुसार साखर आणि पाणी घालू शकता.
टपरीवर मिळतो तसा परफेक्ट चहा घरीच करा; दूधात घाला 'हा' पदार्थ, गारठ्यात प्या गरमागरम चहा
5) तयार फोडणी वाफवून घेतलेल्या ढोकळ्यात घाला आणि सुरीच्या साहाय्याने त्याचे चौकोनी काप करून घ्या. तयार आहे स्वादीष्ट ढोकळा, हा ढोकळा तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता.