Join us  

बेसनाचे मऊसूत तलम लाडू करण्यासाठी घ्या खास रेसिपी, खमंग बेसन लाडू गणपतीत नैवेद्याला हवाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2023 12:12 PM

How to Make Besan ke Ladoo, without Sugar Syrup बिना पाकाचे - तोंडात टाकताच विरघळणारे तयार करा स्वादिष्ट बेसनाचे लाडू

बेसनाचे लाडू म्हटलं कि तोंडात पाणी सुटतेच. लाडू अनेक प्रकारचे केले जातात. त्यात बेसनाचे लाडू खाणारा खवय्यावर्ग मोठा आहे. बेसनाचे लाडू फक्त दिवाळीत नसून, इतरही सणानिमित्त केले जातात. बेसनाचे लाडू खाण्यासाठी निमित्त लागत नाही. आपण कधीही आवडीनुसार बेसानाचे लाडू करून खाऊ शकता.

अनेकदा साहित्यांचे प्रमाण चुकल्यामुळे लाडू नीट तयार होत नाही. जर आपल्याला परफेक्ट पद्धतीने तेही साखरेचा पाक तयार न करता करायचे असतील, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. पाकाची भानगड असल्यावर अनेकदा लाडवाचं गणित बिघडतं. त्यामुळे कमी वेळात मेहनत न घेता मस्त साजूक तुपातला खमंग बेसनाचा लाडू तयार करायचा असेल, तर ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा(How to Make Besan ke Ladoo, without Sugar Syrup).

बेसनाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

तूप

पाणी

पिठीसाखर

गोकुळाष्टमी विशेष : दही पोहे करण्याची घ्या पारंपरिक रेसिपी, दही पोह्याचा नैवेद्य तर हवाच..

वेलची पावडर

ड्राय फ्रुट्स (ऑप्शनल)

कृती

सर्वप्रथम, पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून गरम करण्यासाठी ठेवा. तूप विरघळल्यानंतर त्यात २ कप बेसन घाला. व खमंग सुवास दरवळू पर्यंत छान तुपात भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यानंतर त्यात पुन्हा २ चमचे तूप घाला. व मंद आचेवर चमच्याने ढवळत राहा. बेसनाचा रंग बदलल्यानंतर त्यावर हाताने थोडे पाणी शिंपडा. व चमच्याने मिक्स करा.

१ वाटी चणाडाळीची करा साऊथ इंडियन पद्धतीची चटणी, डोसे - आप्पेसाठी स्पेशल चटणी

तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. लाडवाचं मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात दीड कप पिठी साखर, चिमुटभर वेलची पावडर घालून हाताने मिक्स करा. व हाताला तूप लावून लाडू बांधून घ्या. आपण त्यात ड्रायफ्रुट्स देखील मिक्स करू शकता. अशा प्रकारे बेसनाचे लाडू खाण्यासाठी रेडी. आपण हे लाडू हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सगणेशोत्सव