Join us  

बेसन कच्चं राहून लाडू टाळूला चिकटतो? १ खास युक्ती- घ्या खमंग लाडूंची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2024 9:06 AM

How To Make Besan Ladoo: बेसन कच्चं राहिलं तर लाडू टाळूला चिकटतो. म्हणूनच बेसन लाडू करण्याची ही एक खास रेसिपी बघा... यामध्ये आपण बेसन विकत न आणता घरीच कसं करायचं ते पाहणार आहोत. (simple recipe of besan ladoo in marathi)

ठळक मुद्देलाडू परफेक्ट जमावे यासाठी ही एक सोपी रेसिपी पाहा, बाप्पाला खमंग- चवदार बेसन लाडूंचा नैवद्य दाखवा...

गौरी- गणपतीच्या सणामध्ये आवर्जून केला जाणारा एक गोड पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू. दसरा दिवाळीलाही आपण बेसनाचे लाडू करतोच. पण बऱ्याचदा असं होतं की बेसन कच्चं राहातं. त्यामुळे मग लाडू खाताना तो टाळूला चिकटतो. कधी कधी लाडवामध्ये तूप किंवा साखर जास्त होते आणि लाडू घट्ट होतच नाही. विरघळू लागतात किंवा ताटात जिथे ठेवले तिथे चिटकून बसतात. असं होऊ नये आणि लाडू परफेक्ट जमावे यासाठी ही एक सोपी रेसिपी पाहा (how to make besan ladoo?) आणि बाप्पाला खमंग- चवदार बेसन लाडूंचा नैवद्य दाखवा...(simple recipe of besan ladoo in marathi)

बेसनाचे लाडू करण्याची रेसिपी 

 

साहित्य 

अर्धा किलो चणाडाळ

३०० ग्रॅम साखर 

जुलाब होत आहेत, पोट बिघडलं? 'हा' पदार्थ चिमूटभर खाऊन पाणी प्या- चटकन मिळेल आराम

२०० ग्रॅम तूप 

१ टीस्पून वेलची पूड 

 

कृती 

सगळ्यात आधी हरभरा डाळ कढईत टाका आणि ती सोनेरी रंगाची होईपर्यंत मध्यम आचेवर छान भाजून घ्या. भाजून घेतलेली डाळ कोमट झाली की मिक्सरमध्ये फिरवून रवाळ दळून घ्या. 

लेकीला वळण लागण्यासाठी अनुष्का शर्मा करते 'या' गोष्टी, म्हणाली आम्ही परिपूर्ण पालक नाही, पण....

आता कढईमध्ये आपण तयार केलेले बेसन आणि तूप टाका आणि सात ते आठ मिनिटे दोन्ही पदार्थ मध्यम आचेवर भाजून घ्या.

यानंतर गॅस बंद करा आणि एकत्रित केलेले बेसन, तूप एका भांड्यात काढून घ्या. हे मिश्रण थंड झालं की त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड टाका. सगळं एकदा छान एकत्र करून घ्या आणि त्याचे लाडू वळा. लाडू वळताना मिश्रण कोरडं झालं आहे, असं जाणवल्यास थोडं तूप गरम करून टाकू शकता. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.गणेश चतुर्थी २०२४गणेशोत्सव