Join us  

घरात कोणतीच भाजी नसेल तर खमंग बेसन पराठे करा- नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठीही परफेक्ट मेन्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2024 12:28 PM

Besan Paratha Recipe In Marathi: नाश्त्यासाठी, रात्रीच्या जेवणासाठी किंवा मग मुलांना डब्यात देण्यासाठी बेसन पराठे हा एक उत्तम पदार्थ आहे.(easy and quick recipe for kids tiffin and breakfast)

ठळक मुद्देहे पराठे २ ते ३ दिवस चांगले टिकतात. त्यामुळे प्रवासात करून नेण्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे.

बऱ्याचदा असं होतं की घरात कोणतीच भाजी नसते. अगदी कांदा- बटाटा- टॉमेटोही संपलेलं असतात. अशावेळी काय करावं असा प्रश्न पडतो. तुमच्याकडे अशी कधी वेळ आली तर ही बेसन पराठ्यांची रेसिपी लक्षात ठेवा (How to make besan paratha?). ही रेसिपी करण्यासाठी कोणत्याही भाजीची गरज नाही. सकाळच्या वेळी गडबडीत मुलांना डब्यात देण्यासाठीही बेसन पराठा उत्तम आहे. शिवाय हे पराठे करण्यासाठी आपण हरबरा डाळीचे पीठ वापरणार आहोत (Besan paratha recipe in marathi). त्यामुळे भरपूर प्रोटिन्स देणारा हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला (perfect breakfast recipe) किंवा रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. (easy and quick recipe for kids tiffin and breakfast)

बेसन पराठा करण्याची रेसिपी

 

साहित्य

दिड वाटी कणिक

अर्धी वाटी बेसनपीठ

अर्धा टिस्पून धने पूड

फक्त ५ मिनिटांत न घासता फ्रिज होईल नव्यासारखं चकाचक, ४ पदार्थांची भन्नाट जादू- बघा सोपा उपाय

अर्धा टिस्पून जीरे पूड

१ चमचा कसूरी मेथी

अर्धा टिस्पून ओवा

अर्धा टिस्पून चाट मसाला

थोडीशी हळद 

चवीनुसार थोडा गरम मसाला आणि थोडं तिखट

अर्ध्या लिंबाचा रस

२ ते ३ टेबलस्पून तेल

 

कृती

सगळ्यात आधी तर नेहमीप्रमाणे पोळ्या करण्यासाठी जशी कणिक भिजवून घेतो, तशी कणिक भिजवून घ्या.

जाड दिसता म्हणून साडी नेसणंच टाळता? साडी निवडताना ६ गोष्टी लक्षात ठेवा, दिसाल स्लिम- उंच

त्यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्या. त्यात तिखट, मसाला, मीठ, कसूरी मेथी, धने- जिरे पूड, लिंबाचा रस असं सगळं घाला आणि तेल घालून हे पीठ कालवा.

बेसन पीठ भिजवताना त्यात अजिबात पाणी घालू नका. हे पीठ पुर्णपणे तेलातच कालवावे. साधारण डोसे करताना जसं पीठ असतं, त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ कालवा. 

आपल्याला असं वाटू शकतं की या रेसिपीमुळे खूप तेल पोटात जाईल, पण खरंतर एका पराठ्याला १ किंवा पाऊण टेबलस्पून एवढंच बेसन आपण लावणार आहोत. त्यामुळे जास्त तेल पोटात जाणार नाही. तेलामुळे हे पराठे २ ते ३ दिवस चांगले टिकतात. त्यामुळे प्रवासात करून नेण्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे.

 

आता सगळ्यात आधी पोळी लाटून घ्या. त्या पोळीच्या वरच्या बाजुला अर्धा ते १ टेबलस्पून एवढे बेसन पीठ पसरवून लावा. तुमच्या पोळीचा आकार केवढा आहे, यावर किती बेसनपीठ लागेल ते अवलंबून आहे.

सोनम कपूरने बाळंतपणानंतर घटवलं तब्बल २० किलो वजन, बघा वेटलॉससाठी तिने नेमकं काय केलं...

आता बेसनपीठ लावलेली पोळीचा रोल करा. हा रोल पुन्हा दुमडून घ्या आणि पुन्हा लाटून घ्या. दुसऱ्यावेळी पराठा लाटताना तो थोडा जाडसर लाटावा.

आता तव्यावर टाकून तूप लावून छान खरपूस भाजून घ्या.

चटणी, लोणचं, सॉस, तूप यासोबत खायला पराठा खूप चवदार लागतो.  

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती