Join us  

करंज्या होतील खुसखुशीत, महालक्ष्मीसाठी करंज्या करताना लक्षात ठेवा 4 टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 6:44 PM

Karanji Recipe: महालक्ष्मीसाठी फराळाची तयारी सुरू झाली असेल आणि करंजी (karanji) करण्याचं टेन्शन आलं असेल, तर या काही टिप्स लक्षात ठेवा. करंजी होईल अगदी खुसखुशीत आणि चवदार (crispy and tasty).

ठळक मुद्देयंदा महालक्ष्मीसाठी करंजी करत असाल, तर या काही टिप्स नक्की ट्राय करून बघा.नेहमीपेक्षा यावेळी तुमची करंजी निश्चितच अधिक चवदार आणि खुसखुशीत होईल.

महालक्ष्मी, दिवाळी अशा सणवाराला करंजी हा आपला पारंपरिक पदार्थ करावाच लागतो. पण करंजी करणं हे अजिबात सोपं काम नाही. कधी करंजीचा खुळखुळा होऊन जातो, तर कधी करंजी खूपच वातड- कडक होऊन जाते. कधी कधी करंजीचे तुकडे (How to make best karanji for Mahalaxmi?) पडायला लागतात, तर कधी करंजी तुटतच नाही. करंजीचे प्रयोग अनेक जणींचे अनेक वेळा फसलेले आहेत. त्यामुळेच तर यंदा महालक्ष्मीसाठी करंजी करत असाल, तर या काही टिप्स (4 tips for making perfect karanji) नक्की ट्राय करून बघा. नेहमीपेक्षा यावेळी तुमची करंजी निश्चितच अधिक चवदार आणि खुसखुशीत होईल. (How to make crispy karanji)

 

खुसखुशीत करंजी करण्यासाठी खास टिप्स..१. करंजी कडक होऊ नये म्हणूनकरंजी कडक होऊ नये म्हणून रवा आणि मैदा यांचं प्रमाण अचूक असावं. तसंच रवा आणि मैदा पाण्यात किंवा अर्धे पाणी, अर्धे दूध घेऊन भिजविण्यापेक्षा पुर्णपणे दुधात भिजवावे. भिजवताना त्यात थोडी साय आणि गरम केलेले साजूक तूपही टाकावे. त्यामुळे करंजी अजिबात कडक होणार नाही. शिवाय करंजीच्या कडा बरेच दिवस मऊ राहतील. 

 

२. पीठ मळताना..रवा आणि मैद्याचं पीठ भिजवल्यानंतर लगेचच त्याच्या करंज्या करायला घेऊ नका. कमीतकमी १ तास तरी पीठ भिजू द्या. हे पीठ तुम्ही जेवढं जास्तीतजास्त मळाल तेवढ्या त्याच्या करंज्या अधिक खुसखुशीत होतील. त्यामुळे पीठ मळण्याचा कंटाळा नकोच.

 

३. करंज्या फाटू नये म्हणून..जे पीठ चांगलं मळलेलं आहे, त्याच्या करंज्या फाटत नाहीत. शिवाय करंजीसाठी घेतलेला गोळा खूप पातळ लाटू नये. करंजीचं पीठ कधीही उघडे ठेवू नये. त्याच्यावर झाकण टाकावं किंवा मग स्वच्छ कपडा ओला करून टाकावा. शिवाय करंजीच्या कडा एकावर एक टाकून जेव्हा दाबाल त्याआधी तिच्या काठांना बोटाने थोडंसं पाणी लावून घ्यावं. जेणेकरून टोके घट्ट चिकटतील आणि कढईत टाकल्यानंतर फुटणार नाहीत.

४. करंजी तळताना..करंजी तळताना नेहमी तुपात तळावी. तसेच खूप जास्त वेळा हलवून नये. खूप लालसर होईपर्यंत तळू नये. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.