Lokmat Sakhi >Food > न लाटता आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करायची? एक जबरदस्त युक्ती; भाकरी फुगेल टम्म

न लाटता आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करायची? एक जबरदस्त युक्ती; भाकरी फुगेल टम्म

How to make Bhakri || Koli Bhakri || Tandlachi Bhakri : पारंपारिक आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करण्याची सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2024 04:30 PM2024-08-05T16:30:23+5:302024-08-05T16:31:20+5:30

How to make Bhakri || Koli Bhakri || Tandlachi Bhakri : पारंपारिक आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करण्याची सोपी पद्धत

How to make Bhakri || Koli Bhakri || Tandlachi Bhakri | न लाटता आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करायची? एक जबरदस्त युक्ती; भाकरी फुगेल टम्म

न लाटता आगरी पद्धतीची तांदुळाची भाकरी करायची? एक जबरदस्त युक्ती; भाकरी फुगेल टम्म

रोजचा स्वयंपाक करायला येणं हे खरंच कौशल्याचं काम (Food). काहींना कितीही शिकलं तरी परफेक्ट स्वयंपाक करायला जमत नाही. काहींना भाजीला व्यवस्थित फोडणी घालायला जमते (Cooking Tips). पण भाकरी किंवा चपाती करायला जमत नाही. भाकरी दिसायला जरी सोपी असली तरी करणं फार अवघड (Bhakri). भाकरी अनेक प्रकारचे केले जातात.

ज्वारी, तांदूळ, नाचणीची भाकरी आपण खाल्लीच असेल. या प्रकारच्या भाकऱ्या करणं सोपं. पण तांदुळाची भाकरी करणं अवघड. तांदुळाची भाकरी करताना नीट फुलत नाही, किंवा उकड करताना चुका होतात. जर आपल्याला सोप्या पद्धतीची तांदुळाची भाकरी करायची असेल तर, एकदा ही रेसिपी फॉलो करून पाहा(How to make Bhakri || Koli Bhakri || Tandlachi Bhakri).

तांदुळाची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य


तांदुळाचं पीठ

केळी रोज खाता, पण त्यासोबत 'हे' ४ पदार्थही खाता? पोट बिघडलेच म्हणून समजा

पाणी

कृती

सर्वात आधी भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चमच्याने तांदुळाचं पीठ घाला, आणि लाकडी पळीने ढवळत राहा. २ मिनीटानंतर उकड एका परातीत काढून घ्या. उकड गरम असतानाच हाताला थोडे पाणी लावून पीठ मळून घ्या.

आंबट ढेकर येतात, सतत लाळ गळते? 'या' ४ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; कारण..

हाताला चटके लागू नये म्हणून पाण्यात हात बुडवत राहा. पीठ मळून झाल्यानंतर गोळा तयार करा. हाताला पाणी लावा, व पाण्याच्या हाताने भाकरी थापून घ्या. जर आपल्याला भाकरी थापायला जमत नसेल तर, लाटण्याने लाटूनही आपण गोलाकार देऊ शकता.

दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर भाकरी टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशारित्या टम्म फुगलेली तांदुळाची भाकरी खाण्यासाठी रेडी.

Web Title: How to make Bhakri || Koli Bhakri || Tandlachi Bhakri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.