Lokmat Sakhi >Food > भेंडी चिरताना देठ फेकून देता? करा एक चटपटीत झकास पदार्थ, करायलाही सोपा...

भेंडी चिरताना देठ फेकून देता? करा एक चटपटीत झकास पदार्थ, करायलाही सोपा...

How To Make Bhendi Chutney Recipe : भेंडीचा देठा कडील भाग वाया न घालवता त्यापासून मस्त चटपटीत अशी चटणी बनवून तोंडी लावण्यासाठी म्हणून खाता येऊ शकते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2023 07:07 PM2023-05-12T19:07:18+5:302023-05-12T19:31:52+5:30

How To Make Bhendi Chutney Recipe : भेंडीचा देठा कडील भाग वाया न घालवता त्यापासून मस्त चटपटीत अशी चटणी बनवून तोंडी लावण्यासाठी म्हणून खाता येऊ शकते...

How To Make Bhendi Chutney Recipe | भेंडी चिरताना देठ फेकून देता? करा एक चटपटीत झकास पदार्थ, करायलाही सोपा...

भेंडी चिरताना देठ फेकून देता? करा एक चटपटीत झकास पदार्थ, करायलाही सोपा...

भेंडीची भाजी ही आपल्याकडे अतिशय लोकप्रिय भाजी म्हणून ओळखली जाते. भेंडीची भाजी बनवण्याव्यतिरिक्त आपण त्याची मसाला भेंडी, कुरकुरी भेंडी, भरली भेंडी, रस्सा भेंडी असे असंख्य प्रकार बनवतो. भेंडीची भाजी ही थोडी बुळबुळीत व चिकट होत असल्यामुळे बहुतेक लोक ती खायला नाक मुरडतात. हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीच्या भाजीला एक महत्वपूर्ण स्थान आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व व प्रोटिन्स असल्यामुळे भेंडी खाणे आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते. 

सडपातळ , करकरीत बांध्याची , नाजूक भेंडीचे पदार्थ बनवायला अतिशय सोपे व खायला चविष्ट लागतात. भेंडी निवडताना तिच्या कोवळेपणाची परीक्षा तिचा देठ मोडून केली जाते. भेंडीची भाजी बनवण्यासाठी भेंडी चिरताना तिच्या देठा कडील भाग आपण कापून फेकून देतो. परंतु हा देठा कडील भाग फेकून न देता आपण त्याची खमंग, झणझणीत अशी तोंडी लावायला चटणी बनवू शकतो. ही चटणी बनवायला अतिशय सोपी आहे. यामुळे भेंडीचा देठा कडील भाग वायाही जाणार नाही व त्यापासून मस्त चटपटीत अशी चटणी बनवून खाता येऊ शकते. भेंडीच्या देठाची चटणी बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Bhendi Chutney Recipe) 

साहित्य :- 

१. तेल - १ टेबलस्पून 
२. चणा डाळ - १ टेबलस्पून 
३. उडद डाळ - १ टेबलस्पून 
४. मेथीचे दाणे - १ टेबलस्पून 
५. लाल सुक्या मिरच्या - ५ ते ६ 
६. भेंडी कापून त्याचे उरलेले देठ - १ कप 
७. जिरे - १/२ टेबलस्पून 
८. मोहरी - १/२ टेबलसून 
९. हिंग - चिमूटभर 
१०. कढीपत्ता - ६ ते ७ पाने 
११. चिंच - १ ते २ 
१२. गुळाची पावडर - १ टेबलस्पून 
१३. मीठ - चवीनुसार

अस्सल सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करा १० मिनिटांत, सोलापुरी चटणीची पारंपरिक रेसिपी...

 

१ कपभर रव्याच्या ‘सालपापड्या’, छोटीशी पापडी हातभर फुलते- पारंपरिक पापडीची भारी रेसिपी...

कृती :- 

१. सर्वप्रथम भेंडी चिरुन झाल्यानंतर त्याचे सर्वात वरच्या टोकाकडचे व खालच्या टोकाकडेचे देठ एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावेत. 
२. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात चणा डाळ, उडद डाळ, मेथीचे दाणे, लाल सुक्या मिरच्या, भेंडी कापून त्याचे उरलेले देठ घालून  ३ ते ५ मिनिटे परतून घ्यावे. 

खमंग खुसखुशीत ‘सोयाबिन थालीपीठ’ खाऊन तर पाहा, वजन कमी करण्यासाठीही पौष्टिक नाश्ता...

उन्हाळ्यांत दही वारंवार आंबट होते ? दही लावायची सोपी पद्धत, दही होईल गोडसर...

३. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये घेऊन त्यात चिंच, गुळाची पावडर, मीठ घालावे आता हे सगळे जिन्नस एकत्रित वाटून त्याची जाडसर भरड बनवून घ्यावी. 
४. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात तेल घालून जिरे, मोहरी, हिंग कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करावी. आता या फोडणीत मिक्सरमध्ये वाटून घेतलेली जाडसर भरड घालावी. २ ते ३ मिनिटे शिजवून झाल्यानंतर भेंडीची चटणी खाण्यासाठी तयार आहे. 

ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज, ना आंबवण्याची; १० मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचे डोसे...

ही चटणी पोळी किंवा वरण - भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.

Web Title: How To Make Bhendi Chutney Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.