Join us  

शेफ कुणाल कपूर सांगतात बिर्याणी मसाल्याची स्पेशल रेसिपी, बिर्याणी होईल चमचमीत-परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2024 12:01 PM

How To Make Biryani Masala At Home: कोणत्याही प्रकारची बिर्याणी करणार असाल तर त्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली ही स्पेशल रेसिपी लक्षात ठेवा. (main ingredients in biryani masala)

ठळक मुद्देतुम्ही कोणत्याही प्रकारची बिर्याणी करणार असाल तरीही हा मसाला तुमच्या बिर्याणीला जबरदस्त टेस्टी बनवेल. 

बिर्याणी हा बहुसंख्य लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात नुसती बिर्याणी असेल तरी अनेकांना ते पुरेसं असतं. काही जणींना घरी अगदी परफेक्ट चवीची बिर्याणी करता येते. पण बहुतांश जणी अशा असतात, ज्यांना त्यांनी केलेल्या बिर्याणीमध्ये नेहमीच काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग आपल्याला पाहिजे असते, तशी काही बिर्याणीची चव येत नाही. आता तुमचं हेच जे काय मिसिंग आहे त्याचं उत्तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी दिलं आहे (How to make biryani masala at home). बिर्याणी मसाला घरच्याघरी कसा तयार करायचा, यची रेसिपी त्यांनी शेअर केली आहे. (Secret recipe of making biryani masala by celebrity chef Kunal Kapoor)

बिर्याणी मसाला कसा तयार करायचा?

 

साहित्य

८ ते १० वेलची

८ ते १० लवंग

१ मोठी वेलची

वर्षभराचं तिखट करून ठेवण्यासाठी मिरच्यांची खरेदी करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा- तिखट चवदार होईल

जायफळाचा पाव तुकडा

अर्धा टेबलस्पून शाही जिरे

पाव टेबलस्पून बडिशेप

जायपत्रीचे ५ ते ६ तुकडे. जायपत्रीलाच काही भागात जावित्री असंही म्हणतात.

 

कृती

सगळ्यात आधी सगळे मसाल्याचे पदार्थ मंद आचेवर एखादा मिनिट भाजून घ्या. 

मसाले भाजताना गॅस मोठा करू नये. यामुळे मसाले जळू शकतात.

राधिका मर्चंटने नेसली होती ती ‘लेहेंगा साडी’ नेमकी असते कशी? साडीचा नवा सुंदर ट्रेण्ड

मसाल्याचे पदार्थ भाजून झाले की ते एका ताटात काढून घ्या आणि थंड होऊ द्या.

पुर्णपणे थंड झाल्यावर ते मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. मसाला कधीही जाडाभरडा असू नये. कारण त्यामुळे त्यातल्या सगळ्या पदार्थांचा स्वाद चांगल खुलून येत नाही. त्यामुळे शक्य होईल, तेवढी बारीक पावडर करून घ्या.

तुम्ही कोणत्याही प्रकारची बिर्याणी करणार असाल तरीही हा मसाला तुमच्या बिर्याणीला जबरदस्त टेस्टी बनवेल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीकुणाल कपूर