Join us

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हणत मुलंही आवडीनं खातील भोपळ्याचं धिरडं! नाश्त्यासाठी खमंग रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2023 15:34 IST

How to Make Bottle Gourd Chilla?: दुधी भोपळ्याची भाजी पाहून नाक मुरडणारी मुलंही अगदी आवडीने फस्त करतील भोपळ्याचं गरमागरम धिरडं... करून बघा (Bhoplyache dhirade recipe)

ठळक मुद्देतीच ती भोपळ्याची भाजी आणि तेच नेहमीचे पराठे यापेक्षा थोडासा वेगळा मेन्यू करून बघा.रेसिपी अगदी सोपी आहे. शिवाय झटपट होणारी.

भोपळ्याच्या भाजीचं नाव घेतलं तरी अनेक जण चेहरा लांब करून जेवायला बसतात. त्यात लहान मुलं असतील तर ही भाजी ताटात घेणंही टाळतात. आता या नावडत्या दुधी भोपळ्याच्या भाजीला पर्याय म्हणून मग आपण पराठे करतो, पण आता तीच ती भोपळ्याची भाजी आणि तेच नेहमीचे पराठे यापेक्षा थोडासा वेगळा मेन्यू करून बघा (How to make Bottle gourd chilla). घरातल्या सगळ्या मंडळींना तर आवडेलच पण लहान मुलंही अगदी आवडीने खातील भोपळ्याचं खमंग चवदार धिरडं (Bhoplyache dhirade), रेसिपी अगदी सोपी आहे. शिवाय झटपट होणारी. सगळ्यांच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो (Tasty and healthy recipe).

 

भोपळ्याचे धिरडे करण्यासाठी लागणारे साहित्य १ लहान आकाराचा दुधी भोपळा 

२ कांदे 

२ ते ३ हिरव्या मिरच्या आणि थोडी काेथिंबीर

लसणाच्या ५ ते ६ पाकळ्या 

भुईमुगाच्या शेंगांची ॲलर्जी म्हणून 'तिने' लढवली अजब युक्ती, विमान प्रवासात शेंगांची ऐसी की तैसी..

१ वाटी हरबरा डाळीचे पीठ 

अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ 

जीरे आणि धने प्रत्येकी एकेक टीस्पून

अर्धी वाटी दही किंवा एक लिंबू

चवीनुसार मीठ

 

कसे करायचे भोपळ्याचे धिरडे?१. सगळ्यात आधी भोपळ्याची साले, आतल्या कडक बिया काढा आणि भोपळ्याचे बारीक तुकडे करून घ्या. कांद्याच्याही फोडी करून घ्या. यानंतर भोपळा, कांदा, मिरच्या, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, जिरे, धने हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

अधिकमास स्पेशल: जावयाला वाण द्यायला स्टिलचं ताटच कशाला, पाहा ३ सुंदर-सुबक पर्याय

२. मिक्सर मधून काढलेली पेस्ट एका भांड्यात काढून घ्या. त्यात रवा, तांदळाचे पीठ, दही आणि हरभरा डाळीचे पीठ घाला. दही नसेल तर एक लिंबू पिळलं तरी चालेल. आता चवीनुसार मीठ टाकून सगळं मिश्रण हलवून घ्या. यानंतर गरजेनुसार पाणी टाकून एरवी धिरडं करायला जसं पीठ भिजवतो, तसं पीठ करा. 

३. आता तुमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तव्याला तेल लावून त्याचे धिरडे करा. त्या धिरड्यावर थोडसं चीज किसून टाकलं की मुलं आणखी खुश होतील आणि लगेचच फस्त करतील. करून बघा हा सोपा पण चविष्ट आणि तेवढाच पौष्टिक पदार्थ

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीपाककृती 2023