Lokmat Sakhi >Food > करा कुरकुरीत पदार्थ झटपट, खूप दिवस टिकणारे ब्रेड क्रम्स करण्याची पाहा परफेक्ट पद्धत....

करा कुरकुरीत पदार्थ झटपट, खूप दिवस टिकणारे ब्रेड क्रम्स करण्याची पाहा परफेक्ट पद्धत....

How to Make Bread Crumbs? Making homemade bread crumbs is dead easy : जास्त दिवस टिकणारे ब्रेड क्रम्स घरच्याघरी कसे बनवायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2023 05:00 PM2023-03-09T17:00:02+5:302023-03-09T17:03:56+5:30

How to Make Bread Crumbs? Making homemade bread crumbs is dead easy : जास्त दिवस टिकणारे ब्रेड क्रम्स घरच्याघरी कसे बनवायचे?

How to Make Bread Crumbs? Making homemade bread crumbs is dead easy | करा कुरकुरीत पदार्थ झटपट, खूप दिवस टिकणारे ब्रेड क्रम्स करण्याची पाहा परफेक्ट पद्धत....

करा कुरकुरीत पदार्थ झटपट, खूप दिवस टिकणारे ब्रेड क्रम्स करण्याची पाहा परफेक्ट पद्धत....

संध्याकाळच्या नाश्त्याला आपल्याला काहीतरी कुरकुरीत किंवा चटपटीत खावंसं वाटत. अशावेळी आपण भजी, आलू टिक्की, कटलेट्स यांसारखे चटपटीत पदार्थ खाणे पसंत करतो. हे पदार्थ कुरकुरीत, चटपटीत असतील तरच खायला मजा येते. हे पदार्थ कुरकुरीत बनविण्यासाठी आपण त्यात ब्रेड क्रम्स घालतो. ब्रेड क्रम्स हे शक्यतो उरलेल्या ब्रेड स्लाईसपासून बनविले जातात. जर आपल्याकडे जास्तीचे ब्रेड उरले असतील तर ते वाया जाऊ नयेत म्हणून आपण त्याचे ब्रेड क्रम्स बनवून ठेवू शकतो.

तळलेल्या खाद्यपदार्थांना अधिक जास्त क्रिस्पी व कुरकुरीत बनविण्यासाठी आपण त्यात ब्रेड क्रम्स घालतो. तसेच हे पदार्थ ब्रेड क्रम्समध्ये घोळवून मग तळल्यास अधिक क्रिस्पी आणि चविष्टय होतात. आपण काहीवेळा ब्रेड क्रम्स बाजारांतून विकत आणतो. बाजारांत हे ब्रेड क्रम्स खूपच महाग किंमतीत विकले जातात. आपण हे ब्रेड क्रम्स झटपट घरच्या घरीच बनवून वर्षभर स्टोअर करुन ठेवू शकतो(How to Make Bread Crumbs? Making homemade bread crumbs is dead easy). 

कृती :- 

१. उरलेले ब्रेड स्लाईस घेऊन त्यांच्या कडा कापून घ्याव्यात. 

२. आता कडा कापून घेतलेल्या ब्रेड्सचे हाताने लहान लहान तुकडे करुन घ्यावेत. 

३. ब्रेड्सचे लहान लहान तुकडे मिक्सरमध्ये घालून २ ते ३ वेळा फिरवून त्यांचा एकदम बारीक भुगा करुन घ्यावा. 

४. आता एक पॅन घेऊन तो मंद आचेवर व्यवस्थित गरम करुन घ्यावा. 

५. त्यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक भुगा करुन घेतलेले ब्रेड क्रम्स या पॅनमध्ये घालून कुरकुरीत होईपर्यंत ४ ते ५ मिनिटे पॅनमध्ये कोरडे भाजून घ्यावेत. 

६. आता हे तयार झालेले ब्रेड क्रम्स थोडे गार झाल्यावर एका हवाबंद काचेच्या बरणीत भरुन नीट स्टोअर करून ठेवावे. 

 


 
अशा प्रकारे वापरा ब्रेड क्रम्स (How To Use Bread Crumbs) :- 

१. ब्रेड क्रम्सच्या वापरामुळे फ्राईड राइसची चव दुप्पट होते हे फार कमी लोकांना माहिती आहे. फ्राईड राइससाठी मसाले तळताना सोबत ब्रेड क्रम्स घाला. असे केल्याने फ्राईड राईसची चव अनेक पटींनी वाढते.

२. सूप बनवण्यासाठी देखील ब्रेड क्रम्स वापरले जाऊ शकतात. असे केल्याने सूपची चव वाढते.

३. संध्याकाळच्या नाश्त्यात बनवलेल्या आलू टिक्की, ओट्स मूग डाळ टिक्की, फ्लॉवर टिक्की, चना डाळ टिक्की इत्यादी तळण्याआधी ब्रेड क्रम्समध्ये कोट करा. त्यानंतर ते तळून घ्या. असे केल्याने टिक्की कुरकुरीत आणि चवदार बनतात.

४. केक बनवताना त्यावर ब्रेड क्रम्स टाकून केलेले गार्निशिंग, केक दिसायला आकर्षक आणि खायला चविष्ट बनवते.

५. समोसे बनवण्यासाठी तुम्ही ब्रेड क्रम्ब देखील वापरू शकता. यासाठी समोस्यांसाठी मसाले शिजवताना सोबत ब्रेड क्रम्स शिजवून घ्या. असे केल्याने समोशाची चव वाढते.

Web Title: How to Make Bread Crumbs? Making homemade bread crumbs is dead easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.